• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चित्रकार विकास मल्हारा प्रतिष्ठेच्या टागोर अवाॅर्डने सन्मानित

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 28, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण –  “गतिशील मन, चित्रात मुक्त होऊन जातं, घडत जातं कळत नकळत आकारात किंवा निराकारात किंवा आपल्या मूळ अस्तित्वात…निरवतेत” असे काव्यात्म सृजन लिहीणारे विकास मल्हारा यांना यंदाचा ‘टागोर अवाॅर्ड’ रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ द्वारा आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच भोपाळ येथे सन्मानित करण्यात आले. रु.५०,०००/-, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. जैन इरिगेशनच्या कला विभागात कार्यरत असलेले विकास मल्हारा यांना प्रख्यात चित्रकार व लेखक अशोक भौमिक व कुलगुरू लेखक संतोष चौबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपूर्ण भारतातून आलेल्या २००० कलाकृतींतून अंतिम पाच पुरस्कारात त्यांच्या ॲक्रॅलिक व चारकोलसह पेपर या माध्यमात केलेल्या “अनटायटल्ड-३” या चित्राची निवड झालेली होती.

पाश्चात्य कला क्षेत्रातील १९ व २० व्या शतकातील कलावाद ते समकालीन कला अशा विविध कला प्रवाहांच्या सखोल अभ्यास, चिंतनशीलतेतून विकास मल्हारा यांनी आपली स्वतःची अमूर्त कलाशैलीचा शोध व अभ्यास करीत असावे. त्याला कबीर, सुफी, ओशो साहित्याची जोड दिली. अंतःप्रेरणा आणि स्वत: जगण्यातील अनुभव यांची सरमिसळ त्यांनी आपल्या चित्रकलेतून केली‌. “या अतरंगी अंतरंगातून भावनांचा आवेग घेऊन माझे चित्र नकळत्या आभासी आकारातून उमलत जाते, माझी अमूर्त चित्रे म्हणजे माझे समर्पण होय.” त्यांच्या अशा समर्पित चित्रावकाशात मातकट,काळपट आणि करड्या रंगाचा संयमित उत्सव असतो. रंग आकारांच्या संगतीला रेषांचा अनवट साज असतो. पद्मश्री भवरलालजी जैन यांचा आशीर्वाद, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचे प्रोत्साहन, अमूर्त चित्रकार गुरुवर्य प्रभाकर कोलते व चित्रकार वासुदेव कामत यांचे मार्गदर्शन नेहमीच त्याच्यासाठी उर्जास्रोत आहे. चित्रकार प्रकाश वाघमारे, जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, प्राचार्य राजेंद्र महाजन, चित्रकार राजू बाविस्कर यांच्यासह कलाप्रेमींनी विकास मल्हारा यांचे कौतूक केले आहे.

Tags: jalgaon jalgaon cityvikas mlhara
Previous Post

धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या पाठपुराव्या ला यश

Next Post

जैन स्पोर्ट्स अकादमीच्या नचिकेत ठाकूरची निवड

Next Post

जैन स्पोर्ट्स अकादमीच्या नचिकेत ठाकूरची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!