जळगाव राजमुद्रा दर्पण | शहरातील तालुका पोलीस ठाण्याजवळच असलेल्या विठ्ठलवाडी येथे दीपक मगन मेहते यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून हात साफ केला. रोकड व दागिने असा एकूण २२ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
घडलेल्या घटनेबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दीपक मेहते यांचे वडील अमरावती येथे पोलीस निरीक्षक असून दोन महिन्यात दुसऱ्यांदा त्यांचे घर फोडण्यात आले. दादावाडी परिसरातील विठ्ठलवाडी भागात दीपक मेहेते राहतात. गोवा येथील कंपनीत ते व्यवस्थापक असून ते तिकडेच राहतात. ५ मे पासून त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार समोर आला. मेहेते यांचे शालक देविदास जाधव यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी घरातील रोख रक्कम आणि दागिने असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दीपक यांचे वडील मगन मेहेते हे अमरावती येथील चांदुरनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात दीपक मेहते यांच्या लहान मुलाचे लग्न असल्याने ते बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी हीच संधी साधत त्यांच्या घरात डल्ला मारून लाखोंचा ऐवज लंपास केला होता.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर देखील काहीही शोध लागला नाही. दरम्यान, झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन चोरटे परिसरात फिरताना दिसून आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर विठ्ठलवाडी परिसरातच आणखी एका सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडल्याची माहिती समोर आली पोलीस तपास करीत आहे.


