• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“१० वर्षाच्या कौटुंबिक वादाला कंटाळून, विवाहितेची गळफास घेत आत्महत्या”

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 15, 2022
in जळगाव
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा दर्पण | १० वर्षाच्या संसारातील कौटुंबिक वादाला कंटाळून जळगाव शहरात विवाहितेने आत्महत्या केली. शहरातली सत्यमपार्क भागात कौटुंबिक जाचाला कंटाळून पिडीतेने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनिता शरद पाटील (वय-३०) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे.सुनिता पाटील आणि तिचे पती शरद मंगल पाटील यांच्यात गेल्या १० वर्षांपासून कौटुंबिक वाद आहेत. दरम्यान, दोघांचा संसार सुरळीत व्हावा यासाठी अनेकांनी मनोमिलनाचा प्रयत्न केला. परंतू, शरद पाटील हा विवाहितेला मारहाण करत असल्याने त्या विभक्त राहत होत्या. विवाहिता सुनिता पाटील या खोटेनगरातील सत्यमपार्क येथे लहान मुलगा आयुषसोबत राहत होत्या. तर पती शरद पाटील हा त्याचे आईवडील आणि मोठा मुलगा वेदांतसोबत पिंपळकोठा येथे वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पाटील याने रागाच्या भरात सत्यमपार्क येथे येऊन घरातील सामानाला आग लावली. यात विवाहितेचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. विवाहितेचे आईवडील यांच्याकडे सुनिता पाटील यांचा लहान मुलगा आयुष देखील राहतो. विवाहिता शुक्रवार १३ मे रोजी रात्री घरी एकट्याच होत्या. मध्यरात्री विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, शनिवारी १४ मे रोजी सकाळी १० वाजता विवाहितेची आई बेबीबाई भाईदास पाटील या मुलीला डबा देण्यासाठी तिच्या घरी सत्यमपार्क येथे आल्या असता त्यांना मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि गणेश सायकर, वासूदेव पाटील, सतिश हारनोळ, संजय भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. विवाहितेने आत्महत्या केली नसून तिचा पती शरद पाटील यानेच तिला गळफास देवून खून केल्याचा आरोप मृत विवाहितेची आई बेबीबाई पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: आत्महत्याजळगाव
Previous Post

शिवाजीनगरवासियांनी आयुक्तांना दिले समस्यांचे निवेदन…..

Next Post

धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…

Next Post

धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!