• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“केतकी चितळे आणि नितीन भावे यांच्यानंतर दोघांची शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट”

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 16, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा दर्पण | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मागील काही दिवसांपासून आक्षेप करणाऱ्या पोस्ट होत आहेत. यात काल जळगाव जिल्ह्यातील दोघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकीत प्रल्हाद पाटील व हरीष कोळी (दोघांचे पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) या दोघा संशयितांनी स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध केला होता. हा प्रकार लक्षात येताच लाडवंजारी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयितांच्या समाजमाध्यमावरील खात्याची तांत्रिक माहिती काढली आहे. लवकरच यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री केतकी चितळे, अडॅ. नितीन भावे यांनी देखील समाजमाध्यमातून पोस्ट करुन खासदार शरद पवार यांची बदनामी केली आहे, वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. त्यामुळे तिचे सोशल मीडियावरचे सर्व अकाऊंट कायमस्वरुपी ब्लॉक करून पोलिसांनी कठोर कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात ती अशाप्रकारचे कृत्य पुन्हा करणार नाही. तिचे मानसिक संतुलन तपासून घ्या, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसांना दिले आहे.

Tags: केतकी चितळेट्विटनितीन भावेशरद पवार
Previous Post

“DCGI कडून COVAXIN ला मान्यता, 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही दिली जाणार लस.”

Next Post

पहाटे पर्यंत सुरू होती हुक्कापार्टी, मात्र पोलिसांनी धाड टाकताच…

Next Post

पहाटे पर्यंत सुरू होती हुक्कापार्टी, मात्र पोलिसांनी धाड टाकताच...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!