• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“जळगाव शहरात शास्त्री टॉवर चे काय आहे रहस्य” जाणून घ्या!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 17, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | शहराच्या मध्यभागी उभा असलेला टॉवरचा इतिहास भाला मोठा आहे. खरे पाहता आजचे जळगाव ८ किलोमीटर चारही बाजूंनी पसरलेले असले तरी पूर्वी मात्र टॉवर चौकापर्यंतच वस्ती होती. आताचे लालबहाद्दूर शास्त्री टॉवरची स्थापना तत्कालीन नपाने केली असली तरी भारतातील महत्वाच्या ठिकाणी घड्याळाचे टॉवर उभारण्यात आले असून त्यांचे स्वरूप भव्य दिव्य असेच आहे.

जळगाव शहरात उभे करण्यात आलेले टॉवर १० मजली उंच असून त्यात अवजड मशिनरी बसविण्यात आली आहे. घड्याळांचे मनोरे शहराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य चौकात उभे करण्याची संकल्पना ब्रिटिशांनी भारतात आणली. भारतातील महत्त्वाच्या क्लॉक टॉवरमध्ये मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर, घड्याळ गोदी, हुसेनाबाई क्लॉक टॉवर (लखनऊ), चौरा बझार क्लॉक टॉवर (हैदराबाद), देहरादून क्लॉक टॉवर, घंटा घर (मिर्झापूर), घंटा घर (जोधपूर), मिंट क्लॉक टॉवर (चेन्नई), क्लॉक टॉवर (म्हैसूर) यांचा समावेश आहे. अशाच महत्त्वाच्या टॉवर्समध्ये जळगाव येथील शास्त्री टॉवरचा उल्लेख केला जातो.

जळगावच्या टॉवरची देखील आपली वेगळी ख्याती आहे. जळगावात खरेदीनिमित्त आलेल्या प्रत्येकाची नजर टॉवरवर गेल्याशिवाय राहत नाही. शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि गजबजलेला चौक म्हणून शास्त्री टॉवर चौकाची ओळख आहे. जळगाव शहरातच नव्हे जिल्ह्यात १० मजली इमारत उभारून टॉवर निर्माण करण्यात आले होते. टॉवरच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या घड्याळाचे डायल १२ फूट आहे. घड्याळाचा मोठा काटा ६ फूट लांब आणि लहान काटा ५.५ फूट लांब आहे. घड्याळाची वाइंडिंग चेन ही ७२ फूट लांबीची आहे. घड्याळाला ऊर्जा देण्यासाठी २०० किलो वजनाच्या चार तबकड्या आहेत. घड्याळात पितळ्याचे चाक असून दर आठ दिवसांनी घड्याळाला चावी द्यावी लागते.

जळगाव शहरातील जेष्ठ नगरसेवक वामनराव खडके यांनी दिलेल्या माहितीनुसार लालबहाद्दूर शास्त्री टॉवरची स्थापना १९६० मध्ये झाली असावी. तत्कालीन लोकप्रतिनिधी पंडितराव कोल्हे, भिकमचंद जैन, सीताराम चौधरी यांनी टॉवरच्या उभारणीत पुढाकार घेतला होता.

Tags: जळगावरहस्यशास्त्री टॉवर
Previous Post

चोरट्यांचा कहर संपेनाच, देवीच्या मंदिरात चोरी….

Next Post

यंदाही जळगावकरांना काढावी लागणार चिखलातून वाट!

Next Post

यंदाही जळगावकरांना काढावी लागणार चिखलातून वाट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!