• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी आणि ओचावार कुटुंबियांना सरकारतर्फे आर्थिक मदत मिळावी….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 21, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

यवतमाळ राजमुद्रा दर्पण | जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते स्व. अनिल ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी व ओचवार परिवारास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी याची मागणी.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मे २०२२ रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जळगाव तर्फे जाहिर निषेध नोंदविण्यात आला व अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले .

निवेदनात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने सांगण्यात आले की , माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागीतल्यानेच सूड भावनेतुन सदर निर्घृण व क्रूर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून आणि प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेले आहे. सदर प्रकरणात व कटात सामील असू शकणारे व अपराध्यांना चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्याही मुसक्या अवळाव्यात आणि त्यांची कसून चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा.

माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जीव घोक्यात घालून काम करून प्रशासन व शासन पारदर्शक चालावे म्हणून आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता स्व. अनिल देवराव ओचावार यांच्या कुटुंबियांना सरकारने तात्काळ दहा लाख रूपयांची अर्थिक मदत जाहिर करून ती आचावर कुटुंबियांना द्यावी. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणे , त्यांना मारहाण करुन त्यांच्यावर हल्ले करणे , त्यांच्या हत्या करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे , ही बाब अत्यंत गंभीर आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनि मागणी केली असल्यास त्यांना आवश्यक तेथे तातडीने पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे . सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन उचित कार्यवाही करून सबंधितांना त्वरित योग्य न्याय मिळवुन द्यावा . या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या .

सदर निवेदन देतांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे , शैलेंद्र सपकाळे , नरेंद्र सपकाळे , गुणवंतराव सोनवणे , विठ्ठल भालेराव , चंद्रकांत श्रावणे , रोहित सोनवणे उपस्थित होते .

Tags: अटकआरोपीक्राईमगुन्हाजळगावयवतमाळ
Previous Post

२५ ते २८ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान….

Next Post

महागाईची अत्यंयात्रा काढून शिवसेने कडून केंद्र सरकारचा निषेध…

Next Post

महागाईची अत्यंयात्रा काढून शिवसेने कडून केंद्र सरकारचा निषेध...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!