• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कार्यकारी मंडळाने निर्णय घेण्याचे अधिकार गमावले ; राज्य तायक्वांदो संघटनेच्या ६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 23, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

पुणे राजमुद्रा दर्पण | ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ( ठाणे) या संघटनेतील ९ पैकी ६ पदाधिकारी यांनी राजीनामे दिले असून एकाधिकारशाही विरुद्ध राज्यातील जवळपास २८ जिल्ह्यांनी अविश्वास दाखवत अलिप्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभर तायक्वांदो खेळात होत असलेल्या घडामोडी, खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा फायदा मिळवून देण्यात असोसिएशनला अपयशाला आल्यामुळे तसेच सर्व अधिकृत जिल्हा संघटना व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एकहाती कारभारामुळे नाराज होऊन कार्यकारी मंडळातील ९ पैकी ६ पदाधिकारी यांनी राजीनामे दिल्याने कार्यकारी मंडळाला आता कुठलेही अधिकार राहिलेले नसतानाही नवीन लोकांची दिशाभूल करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन लोकांना उभे करून मूळ तायक्वांदो खेळाडू असलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांवर अन्याय करण्याचे काम सुरू केले आहे.
संदीप ओंबासे महासचिव असलेल्या कार्यकारी मंडळाने कमी मतात आल्याने धोरणात्मक निर्णय घेण्याचे सर्व अधिकार गमावले आहेत. तरी राज्यातील नवीन लोकांना नियम बाह्य पद्धतीने खोटी माहिती व स्वप्न दाखवून प्रत्येक जिल्ह्यात वाद निर्माण करण्याचे, नवीन जिल्हा संघटना स्थापन करून सुडाचे राजकारण सुरू केले असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये २००९ नंतर महाराष्ट्र राज्यात दोन संस्था कार्यरत होत्या. भारतीय तायक्वांदो फेडरेशन मध्ये ही दोन गट पडले होते. दोन-तीन वर्षांपूर्वी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन कडून नामदेव शिरगावकर यांना काळजीवाहू समितीचे चेअरमन करण्यात आले. त्यानंतर नामदेव शिरगावकर यांनी निवडणूक न घेता स्वतःच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारी मंडळ तयार केले. मात्र नामदेव शिरगावकर यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीच्या वेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ( ठाणे) अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बाहेरुन आपले सोयीचे लोक बसवून तायक्वांदो असोसिएशन महाराष्ट्र ( ठाणे) संस्थेचा कारभार चालवल्या मुळे नाराजी पसरली . त्या नंतर सहसचिव गफार पठाण यांनी राजीनामा दिला व ८ मे २०२२ रोजी उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, प्रविण बोरसे, कोषाध्यक्ष अविनाश बारगजे, सदस्य सुभाष पाटील व व्यंकटेश कररा यांनी एकत्रित राजीनामे दिल्या मुळे आता ९ पैकी ६ पदाधिकारी यांनी कार्यकारी मंडळावर अविश्वास आणला आहे. १५ मे २०२२ रोजी पुणे येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत २८ जिल्हा संघटनांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. आता नामदेव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या कार्यकारी मंडळाला बहुमत नसल्याने धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार राहीला नाही.

उच्च न्यायालयाने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे २०१६ साली झालेल्या निवडणुकीच्या मतदार यादीनुसार २ महीन्यात निवडणुक घेण्याचा आदेश भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला दिले आहेत. तरी महाराष्ट्र राज्यातील अधिकार गमावलेल्या घटना बाह्य संस्थेच्या भूलथापांना लोकांनी बळी पडून त्यांच्यावर विश्वास ठेऊ होऊ नये, असा इशारा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव मिलिंद पठारे यांनी केले आहे.

Tags: अधिकारतायक्वांदोपदाधिकारीपुणेमहाराष्ट्रराजीनामे
Previous Post

CCI कडून भरतीच्या सूचना; पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करा.

Next Post

WHO कडून कोरोनाबद्दल नवीन निर्णय; जाणून घ्या!

Next Post

WHO कडून कोरोनाबद्दल नवीन निर्णय; जाणून घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!