• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! दुभाजकावर चारचाकी आदळून भीषण अपघात; दोघं जखमी तर दोन जण जागीच ठार….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 24, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | मुंबई -गोवा महामार्गावर काल सायंकाळी भीषण कार अपघात झाला. या अपघातात मुंबई परेल येथील दोन जणांचा मृत्यू होऊन, दोघ गंभीर जखमी झाले आहे. हरळलकर हे मुंबईवरुन गोव्याकडे जात असताना साळास्ते जिल्हा परिषद शाळेसमोरील दुभाजकावर कार आदळून हा अपघात झाला. या अपघातात कार चालक आणि त्याच्या बाजूला बसलेली व्यक्ती असे दोन जण ठार झालेत. तर मागच्या सीटवर बसलेले दोन जण गंभीर जखमी झालेत.

हरमळकर हे मुंबई परेल येथून मुलगीसह गोव्यात जात होते. दरम्यान, त्यांनी रत्नागिरी येथील मित्राकडे आधी गेले. तेथून ते गोवा हरमल येथे जात होते. याच दरम्यान त्याचा मित्र राणे आणि त्याचा भाचाही गाडीतून जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातात मृत झालेल्या दोघे मुंबईचे रहिवासी आहेत. संतोष पांडुरंग हरमळकर ( ४८, प्रभादेवी) आणि सुधीर अर्जून राणे (५६, अंधेरी) अशी त्यांची नावे आहेत. तर आकांक्षा संतोष हरमळकर ( २३) आणि अन्य एक जखमी झालेत. मुंबईतून गोव्याकडे निघालेली ही कार भरधाव वेगाने धावत होती. ही कार साळास्ते येथे आली असता रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ही कार कठड्यावर आदळल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या कारलाही ठोकर दिली. या कारचेही नुकसान झाले आहे.

संतोष हरमळकर यांचे गाव पेडणे (गोवा) येथे आहे. रत्नागिरीहून सहाच्या सुमारास ते आपली मुलगी आकांक्षा (२३) यांच्यासह सुधीर राणे यांच्यासोबत गोवातील पेडणे गावात जात होते. त्यानंतर ते पेडणे हरमळ येथील देवस्थानला भेट देणार होते. सायंकाळीसहाच्या सुमारास साळीस्ते येथे संतोष हरमळकर यांचा वाहनावरील ताबा सुटला. यात कार दुभाजकाला आदळून अपघातग्रस्त झाली. यात चालक संतोष हरमळकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी सुधीर राणे यांना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. अपघातात आकांक्षा हरमळकर आणि अन्य एकावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच आजुबाजूचे गावकरी मदतीसाठी धावून आले. कारमधील जखमींना बाहेरील काढत कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मदत कार्यासाठी सरपंच मैथिली कांबळे, चंद्रकांत हरयान,समीर कुलकर्णी,संजय बारस्कर, प्रभाकर ताम्हणकर, पोलीस पाटील गोपाळ चव्हाण, मंगेश कांबळे, वैभव कांबळे, सचिन ताम्हणकर यांनी मदत घेतली. त्यांनी कार अपघात घटनेची माहिती कणकवली पोलिसांना दिली. खारेपाटण पोलीस आणि पोलिस उपनिरीक्षक विनोद कांबळे सह पोलीस,वाहतूक पोलीस घटनास्थळी धाव घेतली. संबंधित घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Tags: अपघातजखमीपोलिसमुंबई- गोवा महामार्गमृत्यू
Previous Post

हवामान खात्याचा अतिमुसळधार पावसाचा इशारा ; सुरू झालेली यात्रा तात्पुरता स्थगित करण्यात आली….

Next Post

शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; जाणून घ्या नक्की आहे तरी काय!

Next Post

शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; जाणून घ्या नक्की आहे तरी काय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!