• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर तालुक्यातील शिंगाडी येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे आमरण उपोषण

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 30, 2022
in Uncategorized
0
रावेर तालुक्यातील शिंगाडी येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे आमरण उपोषण
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | रावेर तालुक्यातील मौजे शिंगाडी येथील पुनर्वसन विषयी मा. कार्यकारी अभियंता , सरदार सरोवर – 1 ( विभाग ) हे मूल्यांकन अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे पुढिल कार्यवाहिस विलंब होत आहे , तरी त्यांनी त्वरित अहवाल सादर करावा . पुनर्वसना करीता गट नंबर 222 / 1 हा समाविष्ट करण्यात आले असुन या गट नंबर वर संबंधित शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या प्लॉट पडलेले असल्याने त्या सर्व नोंदी रद्द करण्यात याव्या व शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी . या प्रमुख मागण्यांसाठी शिंगाडी गावातील ग्रामस्थ 30 मे 2022 पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत .

याबाबत सविस्तर वृत्त असे की , रावेर तालुक्यातील शिंगाडी गावाचे पुनर्वसनाला सन 2007 साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली , तद्नंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली . त्यामध्ये पुनर्वसनासाठी 8 गट नंबर संपादित करण्यात आलेले आहे त्यापैकी गट नंबर 222/1 हे सुद्धा समाविष्ट आहे . सदर क्षेत्र सुस्थितीत असुन देखील ते क्षेत्र संबंधित शेतकरी यांनी कायदा धाब्यावर बसवत त्या क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर शासनाची ना हरकत नसतांना तिथे प्लॉट पाडुन खरेदीखत केलेले आहे आणि बिनशेती नसलेली शेतीचे उतारे शिंगाडी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांनी नमुना नंबर 8 ला कशाच्या आधारावर लावलेत याची संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे . सदर जमीन महसुल कायद्याप्रमाणे तुकडा बंदी असतांना तलाठी सर्कल यांनी कुणाच्या आदेशाने या शेतीची नोंद केली ? मा. प्रांताधिकारी फैजपूर येथील तत्कालीन प्रांताधिकारी मा. अंतुर्लीकर साहेब यांनी संबंधित सहाय्यक निबंधक सावदा यांना सदर गट नंबर वर खरेदी विक्री करू नये असे पत्र दिले असतांना सुध्दा या शेतातील खरेदी विक्री कशी करणेत आली ? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे .

कार्यकारी अभियंता सरदार सरोवर विभाग 1 यांना फैजपूर प्रांत कार्यालयातुन 4 वेळा स्मरणपत्र देऊन देखील यांनी सदर जमिनीचे मूल्यांकन अहवाल सादर केलेला नाही . मूल्यांकन अहवालाअभावी निवाडा घोषित होऊ शकणार नाही . त्यासाठी अनेकदा गावकरी मंडळी व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा. मुकुंदभाऊ सपकाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा काही एक उत्तर त्यांनी दिले नाही . त्यामुळेच ग्रामस्थांनि लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करीत आंदोलनाला सुरुवात केली. ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेऊन त्यांना न्याय न मिळाल्यास , समस्त गावकरी तापी नदीच्या पात्रात जलसमाधी घेईल असा ईशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे .

सदर आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाचे ( आठवले गट ) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे , भुसावळ नगरपालिकेच्या नगरसेविका तथा माजी उपनगराध्यक्षा सौ. लक्ष्मीताई मकासरे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलिप सपकाळे यांनी भेट देऊन त्यांच्या संघटनांच्या वतीने पाठिंबा दिला . तसेच आंदोलनात मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात अनिल बगाडे , अमृत पाटिल , उमेश गाढे , संदीप कोजगे , फुलसिंग कोजगे , आनंदा कोजगे , विजय बगाडे , रमेश पाटिल , विश्वनाथ पाटिल , साहेबराव पाटिल , यादव पाटिल , संतोष बगाडे , प्रभाकर बगाडे , भागवत बगाडे , हिरामण कोजगे , सुमनबाई बगाडे , पुताबाई कोजगे , लिलाबाई कोजगे , गोविंदा कोजगे , प्रविण कोजगे , आशाबाई कोजगे आदि ग्रामस्थ सहभागी झाले .

Tags: #shigadi#आमरण उपोषण#महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाraver
Previous Post

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

Next Post

चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच : आहीरवाडीत घर फोडून ७ लाखाच्या वर ऐवज लंपास

Next Post
चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच : आहीरवाडीत घर फोडून ७ लाखाच्या वर ऐवज लंपास

चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच : आहीरवाडीत घर फोडून ७ लाखाच्या वर ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!