• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरदिवसा वृद्ध महिलेचा खून; आरोपी अजूनही वाऱ्यावर…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 2, 2022
in क्राईम
0
Spread the love

पाचोरा राजमुद्रा दर्पण | संध्याकाळ झाली, अजून दिवे लागले नाही, त्यामुळे आजूबाजूचे नागरिक बघण्यास गेले, तर आजी मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या.

नगरदेवळा जवळील पिंप्री प्र.भ. येथील वृद्ध महिलेची भरदिवसा घरात घुसून धारदार विळ्याने खून केल्याची धक्कादायक घटना ३१मे रोजी सायंकाळी समोर आली. तेजसबाई पूना जाधव (वय ८०) असे मृत वृद्धेचे नाव असून या प्रकरणी पाचोरा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत वृद्धेच्या गळ्यावर विळ्याने दोन वार करण्यात आले आहेत. तेजसबाई जाधव यांना दोन मुले आहेत, ते बाहेरगावी नोकरीस असून त्या एकट्याच पिंप्री येथे राहत होत्या. ३१ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घटना लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, घटनास्थळी हजर झाले. १ जून रोजी सकाळी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी पाहणी करून ठसे घेतले.

तेजसबाई जाधव या घरी एकट्याच राहतात, तर ३१ रोजी सायंकाळी त्यांच्या घराचे दिवे अद्याप लागले नाहीत, अशी माहिती गावातील त्यांच्या नातेवाइकांना कळवण्यात आली. त्यानंतर घराच्या आत जावून पाहिले तर तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करुन त्यांचा खून केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी मृत वृद्धेचा भाचा भागवत बळीराम कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात ४५२, ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 1 जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या निदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: आरोपीखूनजळगाव.पाचोरावृद्ध महिला
Previous Post

धक्कादायक! कपाशीच्या बनावट बियाण्याची विक्री; दोघांना अटक…

Next Post

तब्बल नऊ महिन्यांनंतर नराधमास फाशीची शिक्षा; पीडितेच्या आत्म्यास शांती…..

Next Post

तब्बल नऊ महिन्यांनंतर नराधमास फाशीची शिक्षा; पीडितेच्या आत्म्यास शांती.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!