• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानात दोन एक्सप्रेसची धडक, ३० ठार शेकडो जखमी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 7, 2021
in Uncategorized
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा) पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. यात ३० प्रवासी मरण पावले असून, शेकडो जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, एका एक्स्प्रेस गाडीच्या धडकेमुळे दुसरी एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली. दक्षिण पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात पहाटे ही घटना घडली आहे.

असोसिएटेड प्रेसनं या रेल्वे अपघाताचं वृत्त दिलं आहे. सिंध प्रांतात असलेल्या घोटकी जिल्ह्यात दोन एक्स्प्रेस गाड्यांची धडक झाली. सर सय्यद एक्स्प्रेस रेल्वे गाडीने धडक दिल्यानं मिल्लत एक्स्प्रेस रुळावरून घसरली, अशी माहिती घोटकी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उस्मान अब्दुल्ला यांनी दिली आहे. रेती आणि डहार्की रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. यात जवळपास ३० प्रवासी मरण पावले असून, शेकडो जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केलं. यावेळी परिसरातील गावकरीही पोलिसांच्या मदतीला धावून आले. मृत आणि जखमी प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्यात गावकऱ्यांनी मदत केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अपघातांचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही, अशी माहिती अब्दुल्ला यांनी दिली. ANI नेही स्थानिक वृत्त वाहिनीच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

४ मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाले असून, १४ मृतदेह खराब झाले आहेत. असंख्य प्रवाशी रेल्वेच्या बोगीमध्ये अडकलेले आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बोगी कापाव्या लागणार असून, अवजड मशीन्सची गरज असल्याचंही अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तानमध्ये वारंवार अशी रेल्वे अपघाताच्या घटना घडतात. गेल्या वर्षीही मोठा रेल्वे अपघात झाला होता. त्यात १९ प्रवासी मरण पावले होते. रेल्वे क्रॉसिंग वर पाकिस्तान एक्स्प्रेस एका बसला धडकली होती.

Tags: pakistanrailway accidentsindh
Previous Post

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या प्रदेश महासचिव पदी ज्येष्ठ लोकशाहीर गणेश अमृतकर

Next Post

महात्मा गांधींच्या पणतीला फसवणुकी प्रकरणी सात वर्षे शिक्षा

Next Post

महात्मा गांधींच्या पणतीला फसवणुकी प्रकरणी सात वर्षे शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!