• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री नामदार पाटील यांना वाढदिवसानिमित्त ‘विजयी गदा’ सस्नेह भेट

मान्यवरांसह महापौर सौ.महाजन यांची उपस्थिती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 5, 2022
in जळगाव
0
पालकमंत्री नामदार पाटील यांना वाढदिवसानिमित्त ‘विजयी गदा’ सस्नेह भेट
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्हावासियांच्या विकासरुपी अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेत प्रशासनाच्या साथीने समाजकारणातून विकासरथ हाकणार्‍या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री.गुलाबरावजी पाटील साहेब ऊर्फ भाऊंचा आज, रविवार दि.5 जून 2022 रोजी वाढदिवस. विकासासाठी दृढ़ संकल्प घेऊन सदैव कार्यरत असलेले आदरणीय गुलाबभाऊ म्हणजे एकनिष्ठ व्यक्तिमत्त्व, साहसी, प्रखर वक्ता, खानदेशाचा बुलंद आवाज… आदरणीय मंत्रीमहोदयांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्याप्रति शुभचिंतन व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याभरातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व नागरिक उत्स्फूर्तपणे आज त्यांना भेटत आहेत.

या अनुषंगानेच आज, दि. 5 जून 2022 रोजी सकाळी शिवसेना संपर्क प्रमुख श्री.संजयजी सावंत यांच्यासह जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्रीताई सुनिल महाजन यांच्या हस्ते आदरणीय मंत्रीमहोदयांना वाढदिवसानिमित्त ‘विजयी गदा’ सस्नेह भेट देऊन त्यांना निरामय आरोग्यासह उदंड आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. ही ‘विजयी गदा’ म्हणजे शिवसेनेची विजयी पताका सदैव माननीय भाऊंच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात फिरत राहो याच हेतूने शुभचिंतन व्यक्त करीत त्यांना प्रदान करण्यात आली. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्री.गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, शिवसेनेचे जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.शाम कोगटा, श्री.खुबचंद साहित्या आदी नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #gift#jalgaon rajmudra darpanbirthdaygulabrao patil
Previous Post

अदानी गृप च्या या शेअर्स ने केला चमत्कार! गुंतवणूकदार झाले मालामाल

Next Post

5 जून पर्यावरण दीन; या दिवसाचे महत्व जाणून घेणे आहे गरजेचे…

Next Post

5 जून पर्यावरण दीन; या दिवसाचे महत्व जाणून घेणे आहे गरजेचे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!