• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !

पारोळा किल्ल्याचे संवर्धन करण्यासह त्याचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश !

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 8, 2022
in जळगाव
0
हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !
Spread the love

दिनांक : 8.6.2022 जळगाव जिल्ह्यातील पेशवेकालीन आणि ऐतिहासिक पारोळा किल्ल्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. किल्ल्याची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील 2 वर्षांपासून सातत्याने स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत होती. समितीच्या या चळवळीला यश आले असून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 7 जून 2022 या दिवशी पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक बैठक बोलावली . या बैठकीत किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाला कृती आरखडा तयार करण्याचे, तसेच किल्ल्यात अस्वच्छता अन् गैरकृत्य करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे जळगावचे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, समितीच्या कु. रागेश्री देशपांडे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार अनिल गवांदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयश्री भगत, किल्ला संवर्धक डॉ. अभय रावते आदी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीने मागणी केल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी राऊत यांनी पुढील महत्त्वपूर्ण सूचना प्रशासनाला केल्या आहेत. यात किल्ल्याची डागडुजी करून भिंतीवर उगवलेली झाडे काढणे, किल्ल्याची आतून, तसेच परिसराची स्वच्छता करणे, सांडपाणी जाण्यासाठी गटाराची व्यवस्था करणे, किल्ल्यावर मद्यपान, जुगार आदी अवैध धंदे करणार्‍यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणे, लघवी-शौच करून किल्ल्याच्या परिसर अस्वच्छ करण्याला प्रतिबंध करण्यास सांगितले आहे. समितीच्या मागण्यांची तत्परतेने दखल घेऊन पुढील कार्यवाही केल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

पारोळा किल्ल्याची दुरावस्था लक्षात आल्यावर समितीने राज्य पुरातत्व विभागाकडून माहितीच्या अधिकाराखाली किल्ल्याच्या डागडुजी आणि संवर्धन यांसाठी केलेल्या कामांचा तपशील मागितला होता. जून 2021 मध्ये मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून किल्ल्याच्या संवर्धनाची मागणीही केली होती. शिवसेनेचे स्थानिक आमदार श्री. चिमणराव पाटील यांसह काही दिवसांपूर्वी समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांचीही भेट घेतली होती. त्याला जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे तत्परतेने कार्यवाही करून पारोळा किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाचे कामही वेळेत करावे, असेही समिती म्हटले आहे.

आपला नम्र,

श्री. सुनील घनवट,
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती
(संपर्क : 7020383264)

Tags: #fort#Hindujajagruti samiti#jalgaon rajmudra darpanjalgaonparola
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला बच्चू कडूंनी मारली सुट्टी; कोणकोणते आमदार शिवसेनेची साथ देणार ?

Next Post

मागील चार दिवसात सलग तिसऱ्या दिवशी सोने घसरले; काय आहे आजचे भाव ?

Next Post
मागील चार दिवसात सलग तिसऱ्या दिवशी सोने घसरले; काय आहे आजचे भाव ?

मागील चार दिवसात सलग तिसऱ्या दिवशी सोने घसरले; काय आहे आजचे भाव ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!