• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक; तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू तर 22 जण जखमी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 10, 2022
in Uncategorized
0
धक्कादायक; तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू तर 22 जण जखमी
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । मुंबईतील वांद्रे परिसरात गुरुवारी मध्यरात्री तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. यात 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वांद्रे येथील शास्त्रीनगर या भागात ही इमारत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अर्धा डझन गाड्या व रुग्णवाहिका आणि त्याचसोबत महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सकाळी 10 वाजेपर्यंत बाहेर काढण्यात आले.

ढिगाऱ्याखालून 23 जणांची सुटका करण्यात आली :-
घटनास्थळी पोहोचलेले डीसीपी मंजुनाथ सिंह म्हणाले, ‘मुंबईतील वांद्रे भागातील शास्त्रीनगरमध्ये गुरुवारच्या मध्यरात्री 12.15 च्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुरक्षित आहेत. पहिल्या मजल्यावर बसलेले सहा तर दुसऱ्या मजल्यावर बसलेले सतरा जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, इतर 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून सुमारे 23 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. ते पुढे म्हणाले की, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, आम्ही पुष्टी करू इच्छितो की आता ढिगाऱ्यात कोणीही अडकले नाही.’

बाजूचे घर कोसळल्याने अपघात झाला :-
मुंबईतील वांद्रे परिसरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून कामाच्या शोधात मुंबईत येणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. तीन मजली इमारतीच्या शेजारी असलेले घर दोन दिवसांपूर्वी जमीनदोस्त झाले, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती घटनास्थळावरून जात असताना इमारतीचा मोठा ढिगारा खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

Tags: #bandra#building collapse#rajmudra darpanmumbai
Previous Post

Corona Updates ; महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाने थैमान घातले

Next Post

गृह मंत्रालयात नोकरीची संधी ; 12वी पास या सह अनेक पदांसाठी नोकऱ्या

Next Post
गृह मंत्रालयात नोकरीची संधी ; 12वी पास या सह अनेक पदांसाठी नोकऱ्या

गृह मंत्रालयात नोकरीची संधी ; 12वी पास या सह अनेक पदांसाठी नोकऱ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!