• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समयमर्यादेत हटवावीत – सुनील घनवट

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 9, 2021
in महाराष्ट्र
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा) विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांच्या तर्फे भेट देऊन १२ लोकांना नोटिस देण्यात आल्या आहेत. गेली १७ वर्षे कोणतीच कृती न करणार्‍या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणाच्या संदर्भात पहाणी करून नोटिस दिल्या गेल्या ही एक समाधानाची बाब आहे; मात्र विशाळगडावर वर्ष १९९८ पासून मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण पहाता गडावर ६४ मोठी आणि नव्याने बांधकाम झालेली ४५ हून अधिक छोटी अतिक्रमण आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने केवळ नोटिसा देण्यावर समाधान न मानता, कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व अतिक्रमणे हटवण्यात यावी, अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी केली आहे. गेली अनेक वर्षे पुरातत्व खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने हा गड आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आणि तेथील मंदिरे-नरवीरांच्या समाध्या दुर्लक्षित आहेत.

“माहितीच्या अधिकारात यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार ‘या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बांधकामे झाली आहेत’, असे पुरातत्व खात्यानेच मान्य केले आहे. विशाळगड हा वर्ष १९९८ पासून पुरातत्व खात्याकडे असून यातील काही जमीन जरी वनविभागाकडे असली या गडावर होणार्‍या कोणत्याही अतिक्रमणास पुरातत्व विभागाच अंतिमत: जबाबदार आहे. या गडावर मुख्यत्वेकरून रेहानबाबाच्या दर्ग्यासह जी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत, ती काढून टाकण्यासाठी पुरातत्व विभाग काय करणार आहे ? हेही विभागाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. यातातील काही अतिक्रमणे जरी वनविभागाच्या अंतर्गत येत असतील, तरी या दोन्ही विभागांनी समन्वय साधून गडावरील सर्व अतिक्रमण काढून टाकण्यासाठी पाठपुरावा घेणे आवश्यक आहे.” असे सुनील घनवट यांनी सांगितले.

“यापूर्वीही गेल्या १७ वर्षांत पुरातत्व विभागाने अतिक्रमणांना केवळ नोटीस देण्याच्या पलिकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे या वेळेसही केवळ नोटीस देण्यापुरते मर्यादित न रहाता ही संपूर्ण अतिक्रमणे हटवेपर्यंत त्याचा पाठपुरावा घेणे आवश्यक आहे.” असेही ते म्हणाले. या सोबतच गडाची ग्रामदेवता असणार्‍या श्री वाघजाई देवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यात यावा, तसेच स्मारके, समाध्या, गडाची आणि तटबंदीची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणीही या निमित्ताने करण्यात आली आहे.

Tags: kolhapurmaharashtrapuratatwa vibhagsunil ghanvatvishalgad
Previous Post

मुंबईत पावसामुळे निर्माण परिस्थितीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक सरी

Next Post

कृषिपंपाना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी एचव्हीडीएस योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करा – नितीन राऊत

Next Post

कृषिपंपाना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी एचव्हीडीएस योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करा - नितीन राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!