• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“पावसाने तारले आता कृषि विभागाने मारू नये”

शेतकऱ्यांचे विविध समस्या (रासायनिक खत उपलब्ध व्हावे, पिक विम्या करिता ई- पिक पाहणी मध्ये पिक पेरा सक्ती नको, पोकरा/महा डीबीटी अंतर्गत समान अनुदान मिळावे)बाबत खासदार उन्मेश दादा पाटील यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे दखल घेण्याची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 13, 2022
in कृषी, जळगाव
0
“पावसाने तारले आता कृषि विभागाने मारू नये”
Spread the love

जळगाव -जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना व प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या पुरवठा होतांना अनियमितता असून त्याबाबत तातडीनं दखल घ्या. तसेच शेतकऱ्यांनी आपण लागवड केलेल्या पिकाचा पेरा ई पिक पाहणी या ॲप मध्ये लावल्यानंतर व नुकसान झाल्यानंतर सदरील पीक पेरा ॲप मधून न लावल्यास नुकसान भरपाई देय राहणार नाही असे संबंधित विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. याबाबत शहानिशा करा.”पावसाने तारले आता कृषि विभागाने मारू नये* अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दुपारी चार वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात श्री. संभाजी ठाकूर यांची भेट घेत सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी बाबत चर्चा केली. यावेळी कृषि उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उप संचालक कुरबान तडवी,भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी, माजी सरपंच रवींद्र पाटील, भरारी फाऊंडेशन अध्यक्ष दिपक परदेशी, मोहीम अधिकारी विजय पवार, पोखरा प्रकल्प समन्वयक संजय पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
आपल्या निवेदनात खासदार उन्मेशदादा पाटील यांनी म्हटले आहे की रासायनिक खत (उदा.१०:२६:२६ डी.ए.पी) स्थानिक बाजारपेठेमध्ये जादा दराने/लिंकिंग ने घ्यावा लागत आहेत व काही ठिकाणी खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ जळगाव जिल्ह्यात असलेल्या खतांचा बफर स्टॉक रिलीज करण्याबाबत निवेदन देऊन चर्चा केली व प्रथम प्राधान्याने खत शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना उपलब्ध करून देण्याबाबत देखील चर्चा केली.
त्याच प्रमाणे मागील वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जळगाव जिल्हा मोठ्या प्रमाणात कापूस,सोयाबीन,उडीद,मूग,मका इ. पिकांकरिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती अंदाजे 200 कोटी रुपये कधी नव्हती एवढी नुकसान भरपाई रक्कम सात्यत्याने केलेल्या पाठपुराव्याने मंजूर झाली होती. यावर्षी देखील सदरील योजनेत शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविता असून ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत उदा. शेतकऱ्यांनी आपण लागवड केलेल्या पिकाचा पेरा ई पिक पाहणी या ॲप मध्ये लावल्यानंतर व नुकसान झाल्यानंतर सदरील पीक पेरा ॲप मधून “न” लावल्यास नुकसान भरपाई देय राहणार नाही असे संबंधित विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे परंतु याबाबत प्रत्यक्ष ज्या काही तांत्रिक अडचणी येतात जसे शेतकऱ्यांना संबंधित याबाबत पुरेशी माहिती नसणे, काही शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल हाताळणी शक्य होत नाही इ. या अडचणी लक्षात घेऊन सदरील विषयाची सक्ती न करता महाशय तलाठी यांनी लावलेले पीक पेरे देखील ग्राह्य धरावे अशी मागणीचे निवेदन दिले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजनेबाबत देखील चर्चा झाली. शेतकऱ्यांकडून विशेषत: संरक्षित शेती शेडनेट व पॉलिहाऊस करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना असे लक्षात आले की राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत संरक्षित शेती या घटकाच्या मार्गदर्शक सूचना दि. 14 जानेवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आल्या. परंतु महाडीबीटी या ऑनलाइन पोर्टलने ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांना तात्काळ सदरील मार्गदर्शक सूचना प्रमाणे अनुदान लागु करण्याची निश्चित करण्यात आले (म्हणजेच 14 जानेवारी 2022 नंतर महाडीबीटी पोर्टल मध्ये ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली त्यांना नवीन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुदान मिळेल) परंतु पोकरा अंतर्गत सदरील मार्गदर्शक सूचना ग्राह्य धराव्यात अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत परंतु सदरील मार्गदर्शक सूचना 1 एप्रिल 2022 नंतर लागू करण्याबाबत पत्र असल्याच्या मला माहिती घेत असताना कळाले. यापूर्वी देखील मी या विषयाबाबत 22 मार्च 2022 रोजी वरील विषयाचे निवेदन दिले होते परंतु त्यावर कारवाई न झाल्याने आज तो विषय पुन्हा चर्चा करून कृषी विभागाच्या शेतकऱ्यांच्या लाभाच्या योजना असून समान न्याय म्हणजे महाडीबीटी व पोखरा योजनेला संबंधित मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्यापासून नवीन अनुदान मिळावे याबाबत देखील स्मरण पत्र देऊन निवेदन दिले असून त्याबाबत विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी यावेळी केली.

Tags: #farmar#khasdar unmesh dada patil#moonsoonbjpjalgaon
Previous Post

शिंदे सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला शपथ देणं ‘विनाशकारी’ ठरेल – शिवसेनेचं राज्यपालांना पत्र..

Next Post

उद्धव ठाकरे भाजपकडे हात पुढे करत आहेत ! द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याची काय मोठी कारणे ?

Next Post
उद्धव ठाकरे भाजपकडे हात पुढे करत आहेत !  द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याची काय मोठी कारणे ?

उद्धव ठाकरे भाजपकडे हात पुढे करत आहेत ! द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याची काय मोठी कारणे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!