• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुंभमेळ्याच्या बनावट कोरोना अहवालाच्या चौकशीचे आदेश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 13, 2021
in राष्ट्रीय, शासकीय
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा) एका खासगी लॅबकडून कुंभमेळ्यादरम्यान केलेल्या चाचण्यांचे बनावट अहवाल सादर करण्यात आल्याच्या आरोपाबद्दल आता उत्तराखंड सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. कुंभमेळ्यादरम्यान झालेली गर्दी आणि करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन अशा अनेक बाबींची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून चौकशी हाती घेण्यात आली आहे.

१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हरिद्वार, डेहराडून, तेहरी आणि पौरी या ठिकाणी भरलेल्या कुंभमेळ्याच्या बनावट कोरोना अहवालाचं प्रकरण समोर आलं होतं. पंजाबमध्ये असलेल्या एका व्यक्तीला करोना चाचणीसाठी आपलं सॅम्पल घेतल्याचा मेसेज आला होता. ही व्यक्ती कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये पंजाबमध्ये होती. या व्यक्तीने आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबरचा बनावट अहवालासाठी गैरवापर केल्याची तक्रार ICMR कडे दाखल केली होती. ICMR ने ही गोष्ट उत्तराखंड सरकारच्या लक्षात आणून दिली.

उत्तराखंड सरकारने या खासगी लॅबने कुंभमेळ्यादरम्यान केलेल्या सर्व चाचण्यांची प्राथमिक तपासणी केली. त्यात असे अनेक बनावट अहवाल आढळल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या लॅबला कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

एकूण २४ खासगी लॅब्ज कुंभमेळ्यादरम्यान सहभागी भाविकांच्या करोना चाचण्या करत होत्या. त्यापैकी १४ जिल्हा प्रशासनाने नेमून दिलेल्या होत्या तर १० कुंभमेळा व्यवस्थापनाच्या होत्या. उत्तराखंड उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की कुंभमेळ्यादरम्यान ५०,००० चाचण्या करण्यात आल्या आहेत. हरिद्वारचे जिल्हाधिकारी सी. रविशंकर यांनी सांगितलं की तीन सदस्याची एक समिती यासंदर्भातल्या चौकशीसाठी नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर ते असंही म्हणाले की इतरही सर्व लॅब्सच्या अहवालांची सखोल तपासणी केली जाईल आणि त्यानंतर ही समिती १५ दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करेल. जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मात्र FIR दाखल केली जाईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई होईल.

कुंभमेळ्याचे आरोग्य अधिकारी अर्जुन सिंग सेंगर यांनी सांगितलं की कुंभमेळा व्यवस्थापनाने नेमून दिलेल्या लॅब्स या ICMR ची परवानगी असलेल्या होत्या आणि त्यांनी कुंभमेळ्यादरम्यान RTPCR आणि अँटिजेन मिळून दोन लाखांहून अधिक चाचण्या केल्या आहेत. त्यांना नऊ कोटीहून अधिक रक्कम मोबदला म्हणून देण्यात आली आहे.

Tags: arjun singh sengarcoronacorona testingfake reportkumbhmela
Previous Post

हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले, मुबलक पाणीसाठा

Next Post

तर पुन्हा निर्बंध लावण्याचा वडेट्टीवारांचा इशारा

Next Post

तर पुन्हा निर्बंध लावण्याचा वडेट्टीवारांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!