• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेनेला पुन्हा मोठा फटका ; ठाकरे कुटुंबातील अजून एका सदस्याचा शिंदेंना पाठिंबा

उद्धव 'सेने'ला मोठा फटका, पुतण्या निहारची एकनाथ शिंदे छावणीत एन्ट्री

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 30, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
सेनेला पुन्हा मोठा फटका ; ठाकरे कुटुंबातील अजून एका सदस्याचा शिंदेंना पाठिंबा
Spread the love

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा झटका देत एकनाथ शिंदे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. निहार हे ठाकरे कुटुंबातून आलेले आहेत आणि शिवसेनेचे उत्तराधिकारी देखील आहेत.

एकनाथ शिंदे यांची बंडखोरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी नवे संकट निर्माण करत आहे. पहिले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार आपल्या बाजूने घेतले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. आता ठाकरे कुटुंबातच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

शिंदे यांचा राजकारणात येण्याचा प्रस्ताव :-
एकनाथ शिंदे यांनी निहारसोबतच्या भेटीत राजकारणातही उतरावे, असे म्हटल्याचे वृत्त आहे. त्यावर निहार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

कोण आहे निहार ठाकरे :-
निहार ठाकरे यांच्या वडिलांचे नाव बिंदुमाधव ठाकरे होते, त्यांचा 1996 मध्ये रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. बिंदूमाधव हे बाळासाहेब ठाकरेंच्या तीन मुलांपैकी जेष्ठ होते. उध्दव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे इतर दोन आहेत. राजकीयदृष्ट्या निहार ठाकरे यांचे वडील बिंदुमाधव राजकारणात सक्रिय नव्हते. ते चित्रपट निर्माते राहिले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची भेट घेऊन त्यांना आपल्या पक्षात घेण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे संकेत मिळत आहेत.

शिंदे सरकारबाबत आदित्य यांचा दावा :-
एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे सतत धक्का देत आहेत. तर दुसरीकडे उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. एकनाथ शिंदे यांचे सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी आपल्या निष्ठा यात्रेदरम्यान केला आहे. लवकरच महाराष्ट्रातील जनतेला मध्यावधी निवडणुका पहाव्या लागणार आहेत.

Tags: #nihar thakre#supporteknath shindeshivsenauddhav thakre
Previous Post

आजचे राशिभविष्य-

Next Post

सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या आज कुठे पोहोचला 10 ग्रॅम सोन्याचा दर ?

Next Post
सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या आज कुठे पोहोचला 10 ग्रॅम सोन्याचा दर ?

सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या आज कुठे पोहोचला 10 ग्रॅम सोन्याचा दर ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!