• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉक्टरांचे अठरा जून रोजी देशव्यापी आंदोलन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 16, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, शासकीय
0
डॉक्टरांचे अठरा जून रोजी देशव्यापी आंदोलन
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राष्ट्रीय तथा महाराष्ट्र राज्य आय. एम. ए. द्वारे १८ जून रोजी देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती आय. एम. ई. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी आणि डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी दिली.

‘हा दिवस देशभरातील डॉक्टर राष्ट्रीय निषेध दिन म्हणून पाळणार आहेत. हे आंदोलन कोविडच्या सर्व प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनाची भूमिका जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. कोविड १९ ची दुसरी जागतिक साथ साधारण मार्च २०२० च्या आसपास भारतात सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत जगात १७.५ कोटी, भारतात २.९५ कोटी, महाराष्ट्रात ५९.०८ लाख लोक या विषाणूमुळे बाधित झाले आहेत. तीन लाखाच्या आसपास लोकांनी यात आपले प्राण गमावले आहेत. हा मृत्यू दर कमी राखण्यात आय. एम. ए. सदस्यांसह देशातल्या आरोग्य यंत्रणेचा फार मोठा वाटा आहे.’ असेही त्यांनी सांगितले.

कोट्यावधी देशवासीयांचे प्राण वाचवताना ७०० पेक्षा जास्त संघटनेच्या डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले असून कारगिल युद्धातील शहीदांच्या संख्येपेक्षा अधिक हा आकडा अधिक आहे. योग ट्रेनर यांनी डॉक्टरांबद्दल अपमानजनक व खालच्या स्तरावर टिपणे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ऍलोपॅथी या शास्त्राबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य याचा आम्ही निषेध करीत आहोत तसेच सर्व वैद्यकीय क्षेत्राच्या योगदानाचा त्यांनी अपमान केला आहे.

या आहेत देशव्यापी आंदोलनात डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या

  • डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा
  • कायद्याचा मसुदा संसदेत सादर करण्यात यावा
  • गृहमंत्रालयाच्या काही आक्षेपांमुळे हा कायदा पारित होण्यापासून थांबलेला आहे तो त्वरित पारित करण्यात यावा
  • सर्व वैद्यकीय आस्थापनास संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात यावे
  • रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे यासह इतर मागण्यांच्या समावेश आहे.

 

याप्रसंगी आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. सी जी चौधरी एस.बी.आय. चे राज्य सचिव डॉ. अनिल पाटील, डॉ स्नेहल फेगडे, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. दिलीप महाजन आदी उपस्थित होते

Tags: anil patilc g chaudharidilip mahajanIMAindiajitendra kolherqadheshyam chaudharisnehal fegade
Previous Post

छ. संभाजीराजेंचा मूक आंदोलनानंतर मोठा निर्णय

Next Post

संधिसाधू लोकांपासून लाभार्थ्यांनी दूर राहावे – खा. उमेश पाटील

Next Post

संधिसाधू लोकांपासून लाभार्थ्यांनी दूर राहावे - खा. उमेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!