• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित होणार

कंपनीच्या आस्थापनांत विशेष सेल्फी पॉइंटची व्यवस्था

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 12, 2022
in जळगाव
0
‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित होणार
Spread the love

जळगाव दि. 10 (प्रतिनिधी) – स्वातंत्र्य लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता दि.15 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्या देशभक्तांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण अंत:करणात कायम जागते राहावे आणि आपला भारत देश सर्वांगीणदृष्ट्या सुजलाम सुफलाम राहावा ही सर्वांचीच मनोभूमिका आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना देशवासीयांसमोर मांडली आहे. प्रस्तुत संकल्पनेला जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व जैन फार्म फ्रेश फूड्स लि. यांनी मातृभूमिच्या जाणिवेतून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित करण्यात येणार आहे. घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी जैन पाईप देखील सर्व सहकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
15 ऑगस्टला कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये ध्वजवंदनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानंतर सहकाऱ्यांसाठी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार असलेला ठेवा लक्षात रहावा म्हणून कंपनीत ठिकठिकाणी सेल्फी पॉइंटचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात जैन इरिगेशनचा प्रत्येक सहकारी हिरीरीने सहभागी होत आहे. यामुळे 8000 सहकाऱ्यांच्या घरावर राष्ट्रध्वज मोठ्या गौरवाने फडकणार असून राष्ट्रभावना प्रज्ज्वलित राहणार आहे.

चौकट

राष्ट्रध्वजासह परिवाराचा फोटो

ध्वजारोहणामध्ये सहभागी सर्व सहकाऱ्यांनी आपल्या घरी राष्ट्रध्वजासोबत एकत्रित परिवाराचे छायाचित्र काढून ते व्यवस्थापनाकडे पाठवायचे आहे असे आवाहनसुद्धा सर्व सहकाऱ्यांना करण्यात आले आहे.

Tags: #har ghar tiranga#jalgaon rajmudra darpanjain irrigation
Previous Post

यापुढे करदात्यांना या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही, नवीन आदेश जारी..

Next Post

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 17 महिलांची सुटका; नऊ दलालांना अटक

Next Post
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 17 महिलांची सुटका; नऊ दलालांना अटक

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 17 महिलांची सुटका; नऊ दलालांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!