• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 1, 2022
in जळगाव
0
मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती
Spread the love

राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – मुस्लिम समाजात अल्लाहचे रूप निरंकारी आहे. त्यामुळे मूर्ती हा प्रकार निषिद्ध आहे. हिंदू धर्मात प्रत्येक देवादिकाची मूर्ती आहे. अगदी दोन टोकांच्या या धर्म पद्धतीला संवेदनशीलतेचा आनंद देणारी वेगळी बातमी समोर आली. शाळेचे मूळ माहेश्वरी विद्याप्रसारक संस्थेची अभिनव माध्यमिक शाळा आहे. धर्माची भिंत श्रद्धा आणि लोकसहभागात आडवी येत नाही अशा सहिष्णु वृत्तीचा आदर्श नववीतील अवघ्या १५ वर्षांच्या आयन मझहर खान पठाण या विद्यार्थ्याने घालून दिला. पोलिसांच्या शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अशा गणेश मंडळात जाऊन सद्भावना आरती करायला हवी.

मनाला प्रसन्न करणारी ही बातमी सुरू होते अभिनव शाळेतून. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे शाळेतील सण-उत्सव बंदच होते. त्यामुळे मुले-मुली कलागुण दर्शनापासून लांब होते. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच निर्बंध हटविले आणि गणेशोत्सवाला दुपटीने उत्साहाचे भरते आले. यावर्षीही शाळेत गणेशोत्सव साजरा करायचे ठरले. पूर्वी शाळेतील शिक्षक आणि मुले-मुली वर्गणी करून उत्सव साजरा करीत. यावर्षी मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी वर्गणी न घेता शिक्षक-पालक-विद्यार्थी सहभागातून उत्सव साजरा करायचे ठरविले. अगदी मूर्तीपासून तर पूजेचे व सजावट साहित्य ज्याला जमेल त्यांनी द्यावे असे ठरले.

इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिका सौ. निता पाटील यांनी वर्गातील मुला-मुलींना उत्सवाची संकल्पना सांगितली. गणेशाची मूर्ती कोण देणार असे विचारले. त्यावर आयान खान पठाण म्हणाला, ‘मैम मी मूर्ती देतो !’ सौ. पाटील यांनीही होकार दिला. हिंदुंच्या सर्वाधिक उत्साह व जल्लोषाच्या उत्सवाला गणेशाची मूर्ती मुस्लिम विद्यार्थी देत होता. संवेदनशीलता येथेच आहे. पण ती येथे संपत नाही.

गणेशाची मूर्ती घेऊन आलेला आयान खान

आयानने वडील मझहर खान पठाण व अम्मीला शाळेतील संकल्पना सांगितली. आयानने गणेशाची मूर्ती द्यायचा शब्द दिला आहे, तो मान्य करून ते सुद्धा मूर्ती द्यायला तयार झाले. धर्मसंस्काराचा कोणताही कडवट संस्कार पठाण कुटुंबाला आडवा आला नाही. विषयाची संवेदनशीलता अजून पुढे आहे.

शाळेत गणेशाची मूर्ती द्यायची तर ती आणावी लागेल. मझहर खान यांचे नातेवाईक (काका सासरे) अयुबखान ताजखान पठाण हे जळगाव येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार चंदुलाल रसवंतीवाले यांच्याकडे गेली २०/२२ वर्षे वेगवेगळ्या देवादिकांच्या मूर्तीचे आणि त्यावर रंगकाम करीत आहेत. आयान खानला गणेशाची मूर्ती हवी हे कळल्यानंतर त्यांनी गणेशाची आकर्षक मूर्ती तयार करून दिली. कलाकाराच्या समोरही कोणत्याही भिंती नसतात हे सिद्ध झाले. आज आयान खान याने शाळेत गणेशाची मूर्ती आणली. त्याच मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक निघाली. गणेशाच्या मिरवणुकीत शाळेतील मुलींचे लेझिम पथक होते. अभिनव विद्यालयातील अनेक उपक्रम जळगावकरांचे लक्ष वेधून घेतात.

Tags: #ganpati#jalgaon rajmudra darpan
Previous Post

जळगावातील रस्त्यांवरून ना. गुलाबराव पाटलांचा रूद्रावतार !

Next Post

आजचे राशी भविष्य, ०२ सप्टेंबर २०२२ ,शुक्रवार

Next Post
आजचे राशिभविष्य ; ३० ऑगस्ट २०२२, मंगळवार , दिनविशेष – हरतालिका

आजचे राशी भविष्य, ०२ सप्टेंबर २०२२ ,शुक्रवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!