• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे वक्तव्य; म्हणाले सरकार वचनबद्ध..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 18, 2021
in राष्ट्रीय
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा) “२१ जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नागरिकाला लोकांना मोफत लस देण्याचे सरकार वचनबद्ध आहे, आपल्याला करोना संदर्भातील प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.” असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड -१९ फ्रंटलाइन कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली. २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा क्रॅश कोर्स प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्र नाथ पांडे याप्रसंगी उपस्थित होते.

“करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये करोना विषाणूचे वारंवार बदलणाऱ्या रुपामुळे कोणती आव्हाने येऊ शकतात हे आपण पाहिले आहे. हा विषाणू अजूनही आपल्या आजूबाजूला आहे आणि त्यात बदल होण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक उपचार पद्धती आणि प्रत्येक शक्यतांसह आपल्याला आपली तयारी अधिक वाढवावी लागेल. या साथीने वारंवार जगाची, प्रत्येक देशाची, संस्थाची, समाजाची, कुटूंबातील माणसांच्या मर्यादांची परीक्षा घेतली आहे. त्यामुळे आता ४५ वर्षावरीस पुढील वयोगटाप्रमाणे १८ वर्षावरील नागरिकांना देखील मोफत लस मिळणार आहे,” असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

देशभरातील एक लाखांहून अधिक कोव्हिड वॉरियर्सनी कौशल्यपूर्ण बनवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. कोविड योद्धांना होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, अ‍ॅडव्हान्स केअर सपोर्ट, इमरजन्सी केअर सपोर्ट नोकरीच्या क्षेत्रांसाठी प्रशिक्षण दिले जाईल. केंद्रीय कौशल विकास योजना ३.० अंतर्गत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून या योजनेसाठी एकूण रु. २७६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

Tags: corona lasikarancovid 19crash course programindianarendra modipantpradhan
Previous Post

राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Next Post

जर माझ्या चौकश्या झाल्या तर हा राजकीय विषय कसा असू शकतो! – एकनाथराव खडसे.

Next Post

जर माझ्या चौकश्या झाल्या तर हा राजकीय विषय कसा असू शकतो! - एकनाथराव खडसे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!