• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बुडून मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 10, 2022
in जळगाव
0
बुडून मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन
Spread the love

जळगाव,राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – दिनांक ९ (प्रतिनिधी ) : – तालुक्यातील शिरसोली येथील पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला असून या दोन्ही कुटुंबियांची आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रूपयांची वैयक्तीक मदत देखील केली.

या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील शिरसोली येथील मुले हे जवळग असलेल्या धारागीर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात निलेश राजेंद्र मिस्त्री (वय-१७) आणि श्रवण शिवाजी पाटील (वय-१५) या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. या दोन्ही मुलांच्या पार्थिवावर काल सायंकाळी उशीरा अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील हे काल मुंबईत असल्याने त्यांनी मोबाईलवरून या दुर्घटनेची माहिती जाणून घेतली होती. यानंतर आज त्यांनी दोन्ही मयत मुलांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

यातील मयत निलेशच्या पश्चात वडील राजेंद्र एकनाथ मिस्तरी, आई व बहिण असा परिवार आहे. तर श्रवणच्या पश्चात वडील शिवाजी रामकृष्ण पाटील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. श्रवणच्या आईचे दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले असून आता त्याच्या निधनाने पाटील कुटुंबावर वज्राघात झाला आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी बळ मिळावे अशी प्रार्थना केली. याप्रसंगी त्यांनी स्वत:कडून दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रूपयांची मदत देखील केली.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत पं. स. चे माजी सभापती नंदलाल पाटील,सरपंच हिलाल भिल्ल, माजी सरपंच प्रदीप पाटील, अनिल पाटील, माजी उपसरपंच श्रावण ताडे, शेणफडू पाटील, ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर ढेंगे, बापू मराठे, उमाजी पानगळे, प्रकाश मराठे, भगवान पाटील यांची उपस्थिती होती.

Tags: gulabrao patil
Previous Post

आज सोने पुन्हा चमकले, काय आहे आजचा नवीन भाव ?

Next Post

धक्कादायक खुलासा ; झोपडपट्टीतल्या पक्षाला तब्बल ९० कोटी ची देणगी आली कुठून ?

Next Post
धक्कादायक खुलासा ; झोपडपट्टीतल्या पक्षाला तब्बल ९० कोटी ची देणगी आली कुठून ?

धक्कादायक खुलासा ; झोपडपट्टीतल्या पक्षाला तब्बल ९० कोटी ची देणगी आली कुठून ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!