• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील दोन वादग्रस्त प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 16, 2022
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

पोलीस निरीक्षक बकाले व चाळीसगाव RTO वसुली प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट,

परिवहन आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांची देखील होणार उच्चस्तरीय चौकशी,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले दोन पोलीस महासंचालकांना आदेश…

RTO ला हफ्ता देणाऱ्या १०० ट्रक व वाहन चालकांची यादी आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली मुख्यमंत्र्यांना…

मुंबई राजमुद्रा – सध्या जळगाव जिल्ह्यात गाजत असलेले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण बकाले याने मराठा समाजावर केलेले आक्षेपार्ह्य वक्तव्य तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथे उघड केलेली RTO अधिकाऱ्यांची वसुली या दोन्ही प्रकरणांच्या अनुषगाने आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व दोन्ही घटनांची माहिती दिली. दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत.


तसेच सर्वसामान्य ट्रक व वाहन चालक यांच्याकडून हफ्ते घेणाऱ्या चाळीसगाव येथील RTO वसुली प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोप केलेले राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही तसेच त्यांना अभय देणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे RTO यांना हफ्ता देणाऱ्या १०० ट्रक व वाहन चालकांची यादीच दिली असून त्यांचा जबाब घेतला जाणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या दोनही प्रकरणात लक्ष घातल्याने दोन्ही विषयांचे गांभीर्य देखील वाढले असून सदर दोन्ही चौकशीतून काय कारवाई होते याची उत्सुकता आहे.


दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी या दोन्ही प्रकरणांच्या अनुषगाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझी लढाई ही कुठल्या व्यक्ती अथवा जाती विरोधात नसून अन्यायी, भ्रष्टाचारी व जातीयवादी प्रवृत्तीविरोधात आहे. या प्रवृत्तीमुळे गोर-गरीब, वंचित, पिडीत घटक यांच्यावर अन्याय होतो, त्यांचे शोषण होते. त्यामुळे यांना धडा शिकविण्यासाठी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरु राहील असे सांगितले.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakrebjpjalgaonjalgaon polis adhikshkjalgaon RTOkirankumar bakalemla mangesh chavanmukhyamantri eknath shinde
Previous Post

आता हे काय ? लैंगिक शिक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग

Next Post

2 लाखाच्या विम्याचा होणार फायदा ; बघा कोण होऊ शकते लाभार्थी ?

Next Post

2 लाखाच्या विम्याचा होणार फायदा ; बघा कोण होऊ शकते लाभार्थी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!