• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भावी मंत्री आप्पासाहेब ; वाढदिवसानिमित्त मतदार संघात बॅनरच बॅनर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 1, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा |  शिंदे गटामध्ये दाखल होत असताना अनेक आमदारांना मंत्रीपदाची संधी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते त्याहून अधिक आम्ही कुठल्याच अपेक्षेने एकनाथ शिंदे सोबत जात नसल्याचे आमदारांनी देखील सांगितले होते मात्र आता सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटली तरीदेखील दुसऱ्या टप्प्यातील मंत्री मंडळाचा विस्तार अद्याप पर्यंत झालेला नाही यामुळे अनेक आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहे.

यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार किशोर पाटील यांनी देखील मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा अनेक वेळा बोलून दाखवले आताही किशोर पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे इतकेच नाही तर त्यांच्या संपूर्ण मतदारसंघात भावी मंत्री आप्पासाहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असा मजकूर लिहिलेल्या बॅनर्स लागले आहे. शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदासाठी “वेट अँड वॉच” ची भूमिका घ्यावी लागली आहे. मात्र अद्याप पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ न शकल्याने अनेकजण मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहे.

यापूर्वी मुंबईमध्ये हजारो समर्थकांना घेऊन आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले होते मात्र पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर त्यांचे नाव यादीत नव्हते माध्यमांकडून त्यांना मंत्री पदाबाबत विचारणा झाली असता त्यांनी शिंदे साहेबांच्या  माध्यमातून “स्वतः मुख्यमंत्री” असल्याचे सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा पाचोरा विधानसभा मतदारसंघात भावी मंत्री म्हणून किशोर पाटील यांचे बॅनर जळकत असल्याने त्यांच्या येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी वर्णी लागवी म्हणुन कार्यकर्त्यांच्या अशा पल्लवीत झाल्या असल्याचे दिसून येत आहे.

आमदार किशोर पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात, त्यामुळे तत्कालीन नगर विकास मंत्री असताना भरगोस निधी पाचोरा मतदारसंघात मिळाला होता. मात्र संधी मिळाली तर नक्की सोने करेन असे वक्तव्य करणाऱ्या आमदार किशोर पाटील यांना येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळते का ? याकडे आता लक्ष लागून आहे.

Tags: #cm devendra fadnavis#cm eknath shindebhavi mantry shinde gatbjpjalgaon pachora mla kishor patilmantri padshinde gat
Previous Post

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली ; अन 721 किलो गांजा जप्त

Next Post

गुन्ह्यात नाव वगळण्यासाठी मागितले 15 हजार ; दोन पोलीस अधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

Next Post

गुन्ह्यात नाव वगळण्यासाठी मागितले 15 हजार ; दोन पोलीस अधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!