• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हयात PWD विभागासाठी निधी उपलब्ध करुन द्या ; शासकीय कंत्राटदार संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन !

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 5, 2022
in जळगाव
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा | जळगाव जिल्हयात PWD विभागासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत आज ; शासकीय कंत्राटदार संघटनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. याबाबत योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन ना. पाटील यांनी दिले.

शासकीय कंत्राटदार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सा.बां. विभाग अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व दुरुस्ती करणे, पुल क्रार्कीट रस्ते, शासकीय इमारती बांधकाम व इतर कामे केली जातात. सा.बां. विभागामध्ये वरील नमुद कामांचे शासकीय कंत्राटदारांना मार्फत केलेल्या कामांचे देयके मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. शासनाकडुन पुरेसा निधी न मिळाल्यामुळे, कंत्राटदारांचे शेकडो कोटी रुपयाचे देयके थकीत आहे. दिवाळी २०२२ पुर्वी प्रलंबीत देयके अदा करण्यासाठी पुरेसा निधी मिळेल अशी अपेक्षा होती.पंरतु प्रलबित देयकांच्या तुलनेत तुटपुंज्या तरतुदीनुसार अत्यल्प निधी प्राप्त झाला.

ऐन दिवाळीत कंत्राटदारांची चेष्टा शासनाने केली. देयके अदा करण्याकामी पुरेसा निधी नसल्याकारणाने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहे. बँक बाजारपेठ-पुरवठादार इंधन कर्मचारी पगार टॅक्स साठी लाखो रुपये थकल्याने समाजात शर्मेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. कार्यस्थळासंबधीत ग्रामस्त मंडळी, स्थानिक पातळीवरील राजकीय पदाधिकारी तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधींचा काम पुर्ण करण्याबाबतचा तगादा सुरुच असतो. यामुळे सर्व कंत्राटदारांवर मोठे दडपण येणे सहाजीक आहे. निधी अभावी देयके प्रलंबित राहील्याने एकीकडे काम पुर्ण करण्यासाठी दडपण व दुसरीकडे आर्थिक कुचंबणा कंत्राटदार यामुळे संभ्रम अवस्थेत आहेत.

सप्टेंबर २०२२ अखेर पर्यत प्रलंबित देयकांची अंदाजीत रक्कम खालील प्रमाणे आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ अतर्गत चारही विभाग- रु.३०० कोटी (सर्व लेखाशिर्ष) ऑक्टोबर २०२२ मध्ये शासनाने वितरीत केलेला निधी- रु.२९ कोटी. राज्यभरातील इतर जिल्हयामध्ये वितरीत निधी जास्त आहे. या सर्व कारणांमुळे कंत्राटदार पुढील कामे सुरु ठेवण्यास इच्छुक नाहीत. रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. कृपया आपण शासन स्तरावर आमची निधी मागणी करावी व जिल्ह्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन घ्यावा जेणेकरुन २०२२-२३ मध्ये कामे सत्वर पुर्ण करता येतील.

निधी न मिळाल्यास नाईलाजाने संपुर्ण जिल्ह्यात काम बंद आंदोलन पुकारण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही,असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी अभिषेक कौल, राहुलभाऊ सोनावणे, भुषण पाटील, राहुल तिवारी, सुनील पाटील, सुधाकर कोळी,अनिलभाऊ सोनावणे,नानाभाऊ सोनावणे, संदीप भोरटक्के, राजेंद्र चौधरी, मिलिंद अग्रवाल, शितल सोमवंशी, स्वप्नेश बाहेती, मनीष पाटील, प्रशांत महाजन, नितीन गोसावी, विनय बढ़े, प्रमोद नेमाडे, कैलास भोळे आदि उपस्थित होते.

Tags: #gularao patilcontractorpwdshivsena
Previous Post

उपमहापौरांच्या विकास निधीतून राज्याचे विरोधीपक्ष नेते दानवेंच्या हातून कामांचे लोकार्पण

Next Post

अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर, गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने चर्चांना उधान

Next Post

अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर, गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने चर्चांना उधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!