• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा, बिंग फुटताच पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 12, 2022
in क्राईम
0
Spread the love

पुणे : तरुणांच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन त्यांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहे. पुण्यात असाच एक प्रकार उघडकीस आला असून, एका तरुणास साडेपाच लाखांचा गंडा घातला आहे. पनवेल महापालिकेत नोकरीला लावतो, असे आश्वासन देऊन तरुणाकडून साडेपाच लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश तानाजी जगताप (वय 32, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संदीप मारुती पांडव (वय 30, रा. नवी मुंबई), जगन्नाथ बालकृष्ण (वय 37, रा. जुईनगर, ठाणे), नितीन महादू वाघ (वय 38, उल्वे, नवी मुंबई) यांना अटक केली आहे. आरोपींनी तरुणाला पनवेल महापालिकेचे बनावट ओळखपत्र देखील दिले होते. ही घटना 3 डिसेंबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.

दीड लाख रुपये केले परत

सदरील आरोपींनी आपापसांत संगनमत करून फिर्यादीस पनवेल महापालिकेत भरारी पथकामध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. त्यासोबतच नोकरी लावण्याकरिता डिपॉझीट म्हणून फिर्यादीकडून पाच लाख रुपये तसेच फी म्हणून 50 हजार रुपये असे साडेपाच लाख रुपये घेतले. आरोपींनी फिर्यादीच्या नावे पनवेल महापालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून दिले. मात्र, प्रत्यक्षात नोकरी न देता फसवणूक केली. फिर्यादीने पैशांची मागणी केली असता दीड लाख रुपये परत करत चार लाख रुपयांची फसवणूक केली.

Tags: crime newsfraud caseJob FraudPanvelpune crime
Previous Post

WhatsAppचे भन्नाट फिचर, आता कुणीही करणार नाही तुम्हाला डिस्टर्ब

Next Post

गुरांच्या निर्दयीपणे वाहतुकीवर कारवाई, पोलिसांनी केली ४० गुरांची सुटका

Next Post

गुरांच्या निर्दयीपणे वाहतुकीवर कारवाई, पोलिसांनी केली ४० गुरांची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!