• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला, 12 जणांविरोधात गुन्हा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 15, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

चाळीसगाव : व्याजाच्या पैशांच्या वादासह पोलिसात गुन्हा दाखल केल्याच्या रागातून चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवकाच्या मुलासह दोघांवर तलवारीसह चॉपरने हल्ला करण्यात आल्याची घटना शहरातील सेंट्रल बँकेसमोर घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून 12 जणांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अंकित महेंद्र मोरे (वय 15, हनुमानवाडी) या तरुणाला व्याजाने दिलेले पैसे का परत केले नाही? तसेच अंबड पोलीस स्टेशनला तक्रार का केली? अशी विचारणा करत संशयीत आरोपींनी चॉपरने हल्ला चढवत त्यास गंभीर जखमी केले. या हाणामारीत हर्षल दीपक राठोड (वय 16, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) हा तरुणही जखमी झाला. जखमी झालेल्या तरुणांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

याप्रकरणी महेंद्र भगवान मोरे यांच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलिसात सुमित उर्फ बाब अशोकराव भोसले (पोद्दार शाळेजवळ, चाळीसगाव), संतोष उर्फ संता पहेलवान रमेश निकुंभ, श्याम उर्फ सॅम चव्हाण, उद्देश उर्फ गुड्डू सुधीर शिंदे (तिन्ही रा.हिरापूर, ता.चाळीसगाव), सचिन सोमनाथ गायकवाड (बाबाजी चौक, चाळीसगाव), अमोल गायकवाड, कृष्णा गायकवाड (दोन्ही रा.चाळीसगाव), योगेश पांचाळ (हिरापूर), विक्की पालवे व तर तीन ते चार अनोळखी (पूर्ण नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.

Tags: chalisgaonjalgaon crime
Previous Post

आयकर विभागाची मोठी कारवाई, अबू आझमींच्या 30 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी

Next Post

खडसेंनी दिला शिंदे गटाला धक्का, सरपंचासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

खडसेंनी दिला शिंदे गटाला धक्का, सरपंचासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!