• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंनी दिला शिंदे गटाला धक्का, सरपंचासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 15, 2022
in राजकीय
0
Spread the love

बोदवड : तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातील सरपंच कमलाकर तायडे, शिवसेना शिंदे गट शाखाध्यक्ष लहू घुळे, उपसरपंच पवन कोंगळे यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आ. खडसे यांनी उभयंतांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.

या प्रवेश सोहळ्यात सरपंच कमलाकर तायडे म्हणाले की, गावात विकासकामे होतील या आशेने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत होतो परंतु तीन वर्षात भ्रमनिरास झाला. याउलट एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून बोदवड गावात आतापर्यंत अनेक विकासकामे झाली. यापुढे सुद्धा एकनाथराव खडसे विकासकामांना निधी उपलब्ध करून देतील हा विश्वास आहे. जनसंवाद यात्रे दरम्यान बोदवड येथील शिंदे गटाचे इतर पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे कमलाकर तायडे यांनी सांगितले.

बोदवड शहरासाठी विकासनिधी दिला

एकनाथराव खडसे म्हणाले की, बोदवड शहराते सभागृह, बुद्ध विहार, रस्ते, पाणीपुरवठा यासारख्या मुलभूत सुविधांसाठी आतपर्यंत निधी उपलब्ध करून दिला आहे. बोदवड फाटा ते पूर्णा नदी पर्यंत रस्ता डांबरीकरण साठी निधी उपलब्ध करून दिला तसेच भविष्यात सुद्धा राहिलेल्या विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध आहे. प्रवेश केलेल्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात स्वागत आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती दशरथ कांडेलकर, प्रवीण कांडेलकर, माजी सरपंच ज्ञानदेव मांडोकार, वामन पाटील, राष्ट्रवादी युवक शाखाध्यक्ष योगेश इंगळे, उपाध्यक्ष पंजाबराव पाटील, वसंत पाटील, विशाल रोटे, चेतन राजपूत, समाधान माळी व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: #muktaionagaraa. chandrakant patilbodwadeknath khadase
Previous Post

माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला, 12 जणांविरोधात गुन्हा

Next Post

शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!