• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संविधान दिन ते प्रजासत्ताक दिनापर्यंत जळगाव शहरात गर्जणार “जागर संविधानाचा” संविधान जागर समिती च्या बैठकीत निर्णय

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 16, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा : संविधान दिन ते प्रजासत्ताक दिनापर्यत जागर संविधानाचा उपक्रम राबविण्याचा निर्णय संविधान जागर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृहात संविधान गौरव रॅली च्या नियोजनासाठी विविध संस्था व संघटनाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते.


२६ नोव्हेंबर संविधान दिनापासून ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत “जागर संविधानाचा” या उपक्रमांतर्गत संविधान रॅली, व्याख्यानमाला, कवी संमेलन, परिसंवाद, संविधानाची माहिती देणारा चित्ररथ आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. बैठकीला मार्गदर्शन करताना मुकुंद सपकाळे म्हणाले, माणसाला माणूसपण देणाऱ्या भारतीय संविधानात भारतीयांना देण्यात आलेल्या हक्क, अधिकार, कर्तव्य यांची माहिती करून देण्याची आवश्यकता विशद केली.


प्रास्ताविक संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, सरोजिनी लभाणे, विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे,महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे सचिव हरिश्चंद्र सोनवणे , प्रा. प्रितीलाल पवार, प्रा.डॉ.सत्यजित साळवे, दिलीप अहिरे, मिलिंद सोनवणे आदींनी आपले विचार व्यक्त केले.


बैठकीत बापूराव पानपाटील, भरत कर्डिले, चंदन बि- हाडे, वाल्मीक सपकाळे, दिलीप त्र्यंबक सपकाळे, भिमराव सोनवणे, राजू मोरे, उदय पवार, नीलेश बोरा, गुलाबराव कांबळे, महेंद्र केदारे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, जयपाल धुरंदर, अरुण वाघ, सुभाष सपकाळे, जगदीश सपकाळे, संतोष सपकाळे, मल्हार खंडाळे यांच्यासह संविधान जागर समिती, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा,लोकसंघार्ष मोर्चा, छावा मराठा युवा महासंघ , प्रहार संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: jalgaonsanvidhan jagarsavidhandin
Previous Post

फाटक्या, झिजलेल्या चपलांसाठी करोडोची बोली, खरेदीसाठी लागल्या रांगा

Next Post

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! दहावी पास उमेदवारांसाठी निघाली बंपर भरती

Next Post

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! दहावी पास उमेदवारांसाठी निघाली बंपर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!