• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली, दूध संघात खडसे विरुद्ध चव्हाण लढत होणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 16, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावरून खडसे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र खडसे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. स्थानिक उमेदवाराच्या वादावरून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने दूधसंघ निवडणुकीत मुक्ताईनगर तालुका मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगेश चव्हाण हे चाळीसगाव तालुक्यातील असताना सुध्दा मुक्ताईनगर मतदारसंघातून मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

मुक्ताईनगरात चुरशीची लढत होणार

आ.मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिला होता. त्यानंतर मंदाकिनी खडसे ह्या हायकोर्टात गेल्या होत्या. परंतू हायकोर्टानेही आज त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मुक्ताईनगर मतदार संघातून मावळत्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्यासमोर आमदार मंगेश चव्हाण यांचे तगडे आव्हान असल्याने निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फटाके फोडून जल्लोष

न्यायालयाचा निकाल जाहीर होताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळेस भाजप ओबीसी सेलच्या रेखा पाटील, मिलिंद चौधरी, अरविंद देशमुख, दिशांत जोशी, मनोज पाटील, राहुल पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #jalgaon doodh sangheknath khadase
Previous Post

जळगाव दूध संघ अखाद्य तूप विक्री प्रकरणी एकास अटक

Next Post

तोतया अधिकाऱ्यांचा प्रताप, शेतकऱ्याला घातला एक लाखांचा गंडा

Next Post

तोतया अधिकाऱ्यांचा प्रताप, शेतकऱ्याला घातला एक लाखांचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!