• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

18 वर्ष वय पूर्ण झाले ; मग मतदार यादीत “या” पद्धतीने करा नाव नोंदणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 19, 2022
in जळगाव, शासकीय, सरकारी योजना
0
Spread the love

 जळगाव राजमुद्रा – भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला असून दिनांक 9 नोव्हेंबर, 2022 पासून ते 8 डिसेंबर, 2022 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येत आहेत.

          दिनांक 1 जानेवारी, 2023 किंवा त्या आधी 18 वर्षे  पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल. या शिवाय 1 एप्रिल, 1 जुलै, आणि 1 ऑक्टोंबर रोजी किंवा त्याआधी ज्या नागरिकांची वयाची अठरा वर्षे पूर्ण होतील त्यांना देखील आगाऊ नोंदणी करता येणार आहे.

              नागरिकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत किंवा  https://nvsp.in  व https://voterportal.eci.gov.in  या संकेत स्थळावर किंवा  Voter Helpline  मोबाईल ॲप चा वापर करुन नाव नोंदणी करता येईल. यासाठी दिनांक 19 व 20 नोव्हेंबर,  2022, तसेच 03 व 04 डिसेंबर, 2022 रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

          तरी जळगाव जिल्हयातील 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे,  तसेच प्रारुप मतदार यादीत आपले नाव असलेबाबत मतदारांनी खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे वतीने करण्यात येत आहे. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Tags: . mahapalika jalgaon#vidhansabha bhavanmaharashtramatdar nav nodani
Previous Post

संजय राऊत म्हणाले- कारागृहात मला अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन घटलं

Next Post

या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर व साहित्य – साधने

Next Post

या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर व साहित्य - साधने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!