• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ विभागात तब्बल ३८ रेल्वे रद्द, तर १८ गाड्यांच्या मार्ग बदल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 24, 2022
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ ते जळगावदरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या नॉन इंटरलॉकिंग सिस्टिमचे काम होणार आहे. त्यासाठी ५ आणि ६ डिसेंबरला रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. यामुळे ४ ते ६ डिसेंबरदरम्यान अप-डाऊन मार्गावरील तब्बल ३८गाड्या रद्द, तर १८ गाड्यांच्या मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ५ डिसेंबर रोजी भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या ३ रेल्वे रद्द झाल्याने याचा परिणाम चैत्यभूमीला जाणाऱ्या प्रवाशांवरही होणार आहे.

ब्लॉकच्या काळात बिलासपूर-हापा एक्स्प्रेस ५ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, रतलाम मार्गे जाईल. हावडा-अहमदाबाद गाडी ४ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, भोपाळ, रतलाम, छायापुरी मार्गे जाईल. बरोनी-अहमदाबाद गाडी २१ डिसेंबरला इटारसी, रतलाम मार्गे धावेल. अमृतसर-नांदेड गाडी ४ व ५ डिसेंबरला खंडवा, भुसावळ, अकोला मार्गे, चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस ४ व ५ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा भोपाळ, रतलाम मार्गे, छपरा-सूरत एक्स्प्रेस ४ डिसेंबरला इटारसी, भोपाळ, रतलाम, बडोदा मार्गे, भागलपूर-सूरत गाडी ५ डिसेंबरला इटारसी, भोपाळ मार्गे, अहमदाबाद-यशवंतपूर गाडी २९ नोव्हेंबरला वसई, कल्याण, पुणे, दौंड मार्गे, पुरी-ओखा गाडी ४ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ मार्गे, बनारस-हुबळी गाडी ४ डिसेंबरला खंडवा, भुसावळ, बडनेरा, बल्लारशाह, सिकंदराबाद, वाडी मार्गे धावेल. दानापूर-उधना एक्स्प्रेस ४ डिसेंबरला इटारसी, भोपाळ, रतलाम मार्गे जाईल. पुरी-सूरत, सांत्रागाची-पोरबंदर, पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, रतलाम, बडोदा मार्गे धावेल. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बिना, रतलाम, बडोदा मार्गे, यशवंतपूर-अहमदाबाद गाडी २७ नोव्हेंबर व ४ डिसेंबरला दौड, पुणे, कल्याण, वसईमार्गे धावेल. रामेश्वरम-ओखा एक्स्प्रेस २५ नोव्हेंबर व २१ डिसेंबरला अंकाई, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई मार्गे जाईल.

नागपूर-मुंबई रेल्वेच्या फेऱ्या रद्द

४ डिसेंबर : बांद्रा-भुसावळ, भुसावळ-बांद्रा, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस. ५ डिसेंबर : नागपूर-मुंबई सेवाग्राम, मुंबई-नागपूर सेवाग्राम, अमरावती-मुंबई, गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस. ६ डिसेंबर : भुसावळ-बांद्रा. पुणे-नागपूर एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे हुतात्मा, भुसावळ-देवळाली शटल, देवळाली-भुसावळ शटल, भुसावळ-सुरत, भुसावळ-कटनी पॅसेंजर, बांद्रा-भुसावळ, याशिवाय इतर रेल्वे गाड्याही रद्द आहेत.

Tags: bhusawalrailway
Previous Post

विक्रम गोखलेंच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा! अजय देवगणने वाहिली होती श्रद्धांजली

Next Post

पॅन कार्ड हरवले मग चिंता नको: आता घरबसल्या 2 मिनिटात मिळणार ई-पॅन

Next Post

पॅन कार्ड हरवले मग चिंता नको: आता घरबसल्या 2 मिनिटात मिळणार ई-पॅन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!