• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विमानात पडला दरोडा, अन् करोडो रुपये घेऊन हवेतूनच फरार झाला चोर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 25, 2022
in क्राईम
0
Spread the love

आपण आजवर दरोड्याच्या अनेक घटना ऐकल्या किंवा पहिल्या असतील. मात्र चक्क विमान हवेत उडताना दरोडा पडल्याची घटना दुर्मिळच. पण हो ही घटना घडली असून, ब्रीफकेसमध्ये ऑफिसच्या कागदपत्रांची फाईल आणावी तितक्या सहजतेने बॉम्ब घेऊन एक व्यक्ती नॉर्थवेस्टर्न एअरलाईनच्या विमानात चढला. त्याच्या बळावर विमानातला स्टाफ वेठीला धरला, 2 लाख अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागितली आणि त्यानंतर जगाच्या पाठीवरून जणू काही अदृश्य झाला.
तो कुठे गेला, जगला की मेला याची आजही जगात कोणालाही कल्पना नाही. आज तो जगात फक्त एक दंतकथा बनून राहिला आहे.

तारीख होती 24 नोव्हेंबर 1971…दुपारची वेळ आणि अमेरिकेचे ओरेगॉन राज्य. एक सामान्य दिसणारा व्यक्ती पोर्टलँडमधील नॉर्थवेस्ट ओरिएंट एअरलाइन्सच्या काउंटरवर गेला. त्यानं आपलं नाव डॅन कूपर असं सांगितलं. त्यानं कॅश वापरून सिएटल, वॉशिंग्टनसाठी फ्लाइट 305 चे सिंगल तिकीट काढलं. अन् इथूनच सुरू झाला अमेरिकन तपास संस्था ‘एफबीआय’च्या इतिहासातील सर्वात मोठ्या न उलगडलेल्या रहस्याची कहाणी. तो कुठला होता, कुठून आला होता, त्याच्या कुटुंबात कोणी होतं का? याचा थांगपत्ता कधीच लागला नाही. आजही ही केस ‘न सुटलेली’ या वर्गात मोडते. अनेक संशयित होते पण या गुन्ह्यातला आरोपी सापडला नाही.

अन् एअर होस्टेसला बसला धक्का

डॅन कूपर हा साधारण 40-45 वर्षांचा होता. त्यानं काळी टाय आणि पांढरा शर्ट असा बिझनेस सूट परिधान केला होता. फ्लाइट टेक ऑफ होण्याची वाट पाहात होतं. कूपरनं एक ड्रींक, एक बोर्बन व्हिस्की आणि सोडा ऑर्डर केला. दुपारी 3 नंतर कूपरनं एअर होस्टेसला स्लिप दिली. त्याच्या ब्रीफकेसमध्ये बॉम्ब होता आणि एअर होस्टेसनं त्याच्यासोबत बसावं असं त्या स्लिपवर लिहिलं होतं. घाबरलेल्या महिलेनं कूपरनं सांगितल्याप्रमाणं कृती केली. कूपरनं त्याची ब्रीफकेस उघडली आणि तिला दाखवली. त्यात अनेक तारा आणि लाल रंगाच्या नळकांड्या होत्या, ते पाहून एअर होस्टेसला धक्काच बसला. आपण काय म्हणतोय ते लिहून घ्यायला कूपरनं महिलेला सांगितलं.

चार पॅराशूट आणि 200,000 डॉलर्रची मागणी

काही वेळानं एअर होस्टेस चार पॅराशूट आणि 200,000 डॉलर्सची मागणी करणारी एक चिठ्ठी घेऊन फ्लाइटच्या कॅप्टनकडे गेली. जेव्हा विमान सिएटलमध्ये उतरलं तेव्हा कूपरनं पैसे आणि पॅराशूटच्या बदल्यात 36 प्रवाशांना सोडलं. पण त्याने क्रू मेंबर्सपैकी अनेकांना कैद करून ठेवलं. विमानानं पुन्हा उड्डाण केलं आणि कूपरनं कॅप्टनला मेक्सिको सिटीकडे जाण्याचा आदेश दिला. पण मध्येच काहीतरी वेगळंच घडलं, कारण तसं जर घडलं नसतं तर 24 नोव्हेंबरला ‘डीबी कूपर डे’ साजरा झाला नसता.

रात्रीच्या अंधारात दरोडेखोर बेपत्ता

सिएटल आणि रेनोच्या मध्यावर असताना रात्री 8 वाजता कूपरनं पॅराशूट आणि पैशासह विमानाच्या मागच्या बाजूनं उडी मारली. वैमानिकांनी सुरक्षित लँडिंग केलं पण रात्रीच्या अंधारात कूपर कुठे गायब झाला हे आजही गूढ आहे. या घटनेची माहिती मिळताच एफबीआयनं तातडीनं तपास सुरू केला. अनेक वर्षे सुरू असलेल्या नॉर्थवेस्ट हायजॅकिंगमुळे त्याचं नाव नॉरजॅक ठेवण्यात आलं. शेकडो लोकांची चौकशी करण्यात आली, देशभरात वेगवेगळ्या प्रकरणाची माहिती घेण्यात आली. पुराव्यांसाठी विमानाचीही तपासणी करण्यात आली.

मुलाला नोटांनी भरलेली बॅग

तपासानंतर पाच वर्षांपर्यंत संशयितांच्या यादीत 800 हून अधिक नावं समाविष्ट झाली होती. कूपर विमानातून खाली उडी मारून वाचू शकला नाही, असा एक अंदाज लावण्यात आला. त्यानं वापरलेलं पॅराशूट उघडलं गेलं नाही आणि रात्रीच्या अंधारात त्यानं जंगलात उडी मारली. या दाव्याला 1980 च्या दशकात आणखी समर्थन मिळालं जेव्हा एका मुलाला नोटांनी भरलेली एक कुजलेली बॅग सापडली. बॅगेतील नोटांवरील क्रमांक कूपरला दिलेल्या नोटांच्या अनुक्रमांकांशी जुळतात. पण अचानक दिसलेला, विमान हायजॅक करून गूढपणे गायब झालेला माणूस आजही एफबीआय अधिकाऱ्यांसाठी एक रहस्यच बनून राहिलेला आहे.

Tags: crimedaroda
Previous Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष रेल्वेगाड्या धावणार

Next Post

स्टेट बँकेत थेट नोकरीची संधी; कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही, आताच करा अप्लाय

Next Post

स्टेट बँकेत थेट नोकरीची संधी; कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही, आताच करा अप्लाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!