• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टेट बँकेत थेट नोकरीची संधी; कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही, आताच करा अप्लाय

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 25, 2022
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियानं भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार SBI मध्ये 65 पदांवर भरती होणार आहे. ही भरती मोहीम स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या भरतीसाठी घेण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत साईट sbi.co.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची नोंदणी प्रक्रिया 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या या भरती मोहिमेद्वारे 65 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यापैकी 64 पदं व्यवस्थापक आणि 1 पद सर्कल सल्लागारासाठी आहे.

पात्रतेचे निकष:

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार वेबसाईटवर उपलब्ध अधिकृत अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

अशी होईल निवड:

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतींच्या आधारे केली जाईल. या पदांच्या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. काही पदांसाठी मुलाखत 100 गुणांची असेल. निवडीची गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमानं तयार केली जाईल.

अर्ज शुल्क :

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क भरावे लागेल. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे. SC/ST/PWD उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. बँकेच्या करिअर वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या पेमेंट गेटवेद्वारे फी ऑनलाईन भरावी लागेल.

कसा करायचा अर्ज?

या भरती मोहिमेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत साईटला भेट देऊन अर्ज करू शकतात आणि शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

Tags: #bank job#Government job#job recruitment
Previous Post

विमानात पडला दरोडा, अन् करोडो रुपये घेऊन हवेतूनच फरार झाला चोर

Next Post

आश्चर्यकारक! लेकीसाठी बापानं सोडली नोकरी! म्हणाला- पितृत्व लाभणेही एक प्रमोशन

Next Post

आश्चर्यकारक! लेकीसाठी बापानं सोडली नोकरी! म्हणाला- पितृत्व लाभणेही एक प्रमोशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!