• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माहिती अधिकार फेडरेशनचा एक दिवसीय कार्यकर्ता मेळावा संपन्न

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 28, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा एक दिवसीय कार्यकर्ता मेळावा जळगाव येथील रेडक्रॉस सोसायटीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. सदर मेळाव्यास फेडरेशनचे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मार्गदर्शन केले. सुभाष बसवेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रामुख्याने सांगितले की, “प्रशासन पारदर्शक, लोकाभिमुख व जबाबदार रहावे सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा बसावा, सरकारी कार्यालयातील जनतेची अडलेली कामे त्वरित व्हावीत या उद्देशाने माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन कार्य करीत आहे. परंतु प्रशासन व शासन माहिती अधिकार कायद्याविषयी उदासीन आहे. लोकांना थेट अधिकार देणारा व सोयीस्कर असणारा कायदा प्रभावीपणे राबवावा अशी शासनाची मानसिकता व ईच्छा शक्ती राहिलेली नाही, अशा विपरीत परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणुन जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते जोमाने काम करीत आहेत. हे कार्य असेच सुरू रहावे व वाढवावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून अधिक प्रभावीपणे काम कसे करावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केले. सुत्रसंचलन राजधर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन गुणवंतराव सोनवणे यांनी केले. सदर मेळाव्यास जिल्हाध्यक्ष आरिफ पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे, नरेंद्र सपकाळे, पंकज पाटिल, राहुल पाटिल, भिकन चौधरी, दिपक घोगरे, सचिन पाटिल, राजू खडके, भगवान चौधरी, चंद्रकांत श्रावणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: jalgaon news
Previous Post

नोटबंदीमध्ये एकनाथ खडसेंनी काय केले मला माहीत: मंत्री गिरीश महाजनांचा इशारा

Next Post

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले- न्यायालयात बोलावून करणार घात

Next Post

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले- न्यायालयात बोलावून करणार घात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!