• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षकाच्या मुलाने करोडोची मालमत्ता कुठून आणली, एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 28, 2022
in Uncategorized, जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. नोट बंदीच्या काळात तुम्ही काय केलं? हे सर्वांना माहिती आहे. मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला. मात्र त्यानंतर एकनाथ खडसे यांचा देखील पारा चांगलाच चढला. त्यांनी देखील गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. खडसे म्हणाले, मला गिरीश महाजनांची कीव येते, त्यांचं सरकार आहे. त्यांनी मी जे काही केलं आहे त्याची चौकशी करावी. माझं त्यांना आव्हान आहे एका शिक्षकाच्या मुलाकडे करोडो रुपयांची मालमत्ता कशी आली. माझं 40 वर्षांचं राजकीय जीवन जनतेसमोर आहे. सूडबुद्धीने माझा छळ केला. खोटे गुन्हे दाखल केले. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. मला विश्वास आहे, यांना दूध उत्पादक धडा शिकवतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. खडसे म्हणाले, मला गिरीश महाजनांची कीव येते, त्यांचं सरकार आहे. त्यांनी मी जे काही केलं आहे त्याची चौकशी करावी. माझं त्यांना आव्हान आहे एका शिक्षकाच्या मुलाकडे करोडो रुपयांची मालमत्ता कशी आली. माझं 40 वर्षांचं राजकीय जीवन जनतेसमोर आहे. सूडबुद्धीने माझा छळ केला. खोटे गुन्हे दाखल केले. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. मला विश्वास आहे, यांना दूध उत्पादक धडा शिकवतील.

तुझी जबान चूप का राहिली

नोटबंदीच्या वक्तव्यावर आमदार खडसे चांगलेच भडकले. त्यांनी महाजन यांचा एकेरी शद्बात उल्लेख केला. आतापर्यंत तुझी जबान चूप का राहिली, कोणाचा दबाव होता? काय शोधायचं ते शोधून काढा असा जोरदार पलटवार एकनाथ खडसे यांनी केला आहे. दरम्यान आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. पैशाच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याचा यांचा डाव आहे. पण जनता हा डाव हाणून पाडेल.

मराठा समाजाच्या जागेवर अतिक्रमण

जामनेरमधल्या नगरपालिकेतील गैरव्यवहाराच्या तक्रारी झाल्या. पण त्यांची चौकशी का होत नाही. पेन ड्राईव्ह दिला आहे तर चौकशी होऊ द्या. चौकशीत सत्य समोर येईल. माझा काय संबंध आहे ते पण समोर येईल. मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्थेच्या जागेवर गिरीश महाजन यांनी अतिक्रमण केलं. जामनेर ते चाळीसगावपर्यंतच्या शैक्षणिक संस्था कशा हडप केल्या हे सर्वांना माहिती आहे, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं. बाळू पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला. सगळ्या शैक्षणिक संस्था कशा हळप केल्या. दूध उत्पादक संघ आणि त्यात केलेलं काम यावर अधिक बोलणार आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

Tags: eknath khadasegirish mahajan
Previous Post

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले- न्यायालयात बोलावून करणार घात

Next Post

मोठी बातमी! अफताब पुनावाला याच्यावर तलवार हल्ला, पोलिसांकडून हवेत फायरिंग

Next Post

मोठी बातमी! अफताब पुनावाला याच्यावर तलवार हल्ला, पोलिसांकडून हवेत फायरिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!