• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोल मधील यात्रेत मोठी दुर्घटना! बारागाड्यांखाली दबल्याने तरूणाचा मृत्यू

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 30, 2022
in क्राईम
0
Spread the love

एरंडोल : तालुक्यातील तळई गावात बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात गाडीचे चाक पोटावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंपाषष्ठीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचपद्धतीने एरंडोल तालुक्यातील तळई येथे मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता चंपाषष्ठीनिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात तळई गावातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असतो. या गर्दीत तळई येथील राहूल पंडीत पाटील (वय-३०) रा. तळई ता. एरंडोल हा तरूण देखील होता.

धक्का लागल्याने राहुल पडला खाली

दरम्यान, बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमात राहूल पाटील हा गर्दीत धक्का लागल्याने बारागाड्यांच्या समोर आला. या दुदैवी घटनेत त्यांच्या पोटावरून चाक केल्याचे गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद

दरम्यान, राहूल पाटील हा एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत नोकरीला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक ललित भदाणे करीत आहे.

Tags: bara gadyacrimeerandol
Previous Post

महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू तर एक गंभीर

Next Post

केंद्रीय विद्यालयात मेगा भरती, 12वी ते पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Next Post
केंद्रीय विद्यालयात मेगा भरती, 12वी ते पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

केंद्रीय विद्यालयात मेगा भरती, 12वी ते पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!