• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगरात सशस्त्र दरोडा, सराफा व्यावसायिकाचा 18 लाखांचा ऐवज लंपास

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 2, 2022
in क्राईम
0
Spread the love

मुक्ताईनगर : दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड घेऊन पोबारा केला आहे. तालुक्यातील उचंदा येथील सराफा व्यावसायिकाला धारदार शस्त्राने मारहाण करून लुटल्याची घटना नरवेल फाट्याजवळ घडली आहे. व्यावसायिकाकडून मोटार सायकलवर आलेल्या तीन चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण 17 लाख 80 हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. याप्रकरणी व्यावसायिकाने मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील उचंदा येथे निलेश वसंत सोनार (वय 32, रा. नरवेल ता. मुक्ताईनगर) यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. ते दररोज दुकानातील दागिने आणि पैसे घरी घेऊन जात असतात. सायंकाळी ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागिने आणि रोकड घेऊन घरी आपल्या दुचाकीवरून परत जात होते. नरवेल फाट्याजवळ एका पल्सरवर चेह-यावर रुमाल बांधून आलेल्या तिघांनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने व दगडाने मारहान करुन निलेश सोनार यांच्याकडील 9 लाख रुपये किंमतीचे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 80 हजार रुपये किंमतीचे 2 किलोचे चांदीचे दागिने आणि 8 लाख रुपये रोख असा एकूण 17 लाख 80 हजाराचा ऐवज बळजबरीने लुटून नेले. हा झटापटीत चोरट्यांनी निलेश सोनार यांच्या हाताला आणि पायाला चाकूसारख्या शस्त्राने वार केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे हे करीत आहेत.

सोनार यांच्या हाताला पडले 17 टाके

निलेश सोनार यांच्यावर चोरट्यांनी काही दिवस पाळत ठेवली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सोनार यांच्या दुकानाजवळ रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे त्यांनी घटनेच्या दिवशी कारच्या ऐवजी दुचाकी आणली होती. चोरट्यांनी हीच संधी साधत लुटपाट केली. दरम्यान, झटापटी दरम्यान, चोरटे मराठी बोलत असल्यामुळे ते स्थानिक असल्याची तसेच माहितगार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनार यांना चाकू सारख्या शस्त्राने मारल्यामुळे त्यांच्या हाताला 17 टाके पडल्याचे कळते.

Tags: crime newsmuktainagar
Previous Post

खुशखबर! तलाठी भरतीस मंत्रिमंडळाची मान्यता; राज्यातील 4122 पदे भरणार

Next Post

प्रेयसी व तीच्या मुलाचे धर्मांतर, आता प्रियकर म्हणतो तुझे 70 तुकडे करीन; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

प्रेयसी व तीच्या मुलाचे धर्मांतर, आता प्रियकर म्हणतो तुझे 70 तुकडे करीन; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!