• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव ट्रक झाडाला आदळला, चालकासह क्लिनर ठार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 2, 2022
in क्राईम, जळगाव
0
भरधाव ट्रक झाडाला आदळला, चालकासह क्लिनर ठार
Spread the love

एरंडोल: भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या झाडाला जोरदार धडकला. त्यात चालक व क्लीनर हे दोघे ठार झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाच्या खदानीजवळ घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खदानी जवळ म्हसावद कडून एरंडोलकडे लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक (एमपी ११, एच ०८५२) भरधाव वेगाने जात होता. यानंतर ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन झाडावर आदळला. त्यामुळे ट्रकचा समोरील भाग चक्काचूर होऊन ट्रक पलटी झाला. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या अपघाताची तात्काळ १०८ क्रमांकाला व एरंडोल पोलिसांना माहिती देण्यात आली.

जखमींचा रुग्णालयात मृत्यू

ग्रामस्थांनी जखमी क्लीनर शाहरुख खान याला रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर क्रेन बोलून ट्रक चालक प्रकाश गंगाराम बासकले याची क्रेनच्या साह्याने झाड बाजूला करून सुटका केली, तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यालाही एरंडोल ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी रवाना करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर शाहरुख खान याला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर चालक प्रकाश बासकले याचे ग्रामीण रुग्णालयात निधन झाले. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Tags: accidentjalgaon crime
Previous Post

प्रेयसी व तीच्या मुलाचे धर्मांतर, आता प्रियकर म्हणतो तुझे 70 तुकडे करीन; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जळगाव दूध संघाचा आखाडा पुन्हा तापणार! निवडणूक वेळेवरच घेण्याचे शासनाचे आदेश

Next Post

जळगाव दूध संघाचा आखाडा पुन्हा तापणार! निवडणूक वेळेवरच घेण्याचे शासनाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!