• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आसोदा गावाजवळ दुचाकीचा अपघात, विटनेर येथील इसम ठार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 3, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : भरधाव दुचाकीने दुसर्‍या दुचाकीला धडक दिल्याने विटनेर येथील इसमाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. सासर्‍याचे तेरावे आटोपून घराकडे दाम्पत्य निघाल्यानंतर त्यांच्यावर संकट कोसळले. जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळ घडलेल्या अपघात प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीकृष्ण दत्तात्रय वाणी (वय ५०, रा.विटनेरख ता.जि. जळगाव) असे मयताचे नाव आहे तर त्यांच्या पत्नी सुरेखा श्रीकृष्ण वाणी या गंभीर जखमी झाल्या आहेत.

जळगाव तालुक्यातील विटनेर येथील रहिवासी श्रीकृष्ण दत्तात्रय वाणी हे आपल्या पत्नी सुरेखा श्रीकृष्ण वाणी यांच्यासह वास्तव्याला होते. सुरेखा यांचे वडील मयत झाले होते. त्यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला श्रीकृष्ण वाणी हे पत्नी सुरेखा वाणी यांच्यासह भादली येथे कार्यक्रमासाठी दुचाकीने आले होते. शुक्रवार, २ डिसेंबर रोजी दुपारी तेराव्याचा कार्यक्रम आटोपून श्रीकृष्ण वाणी हे पत्नी सुरेखा वाणी यांच्यासह दुचाकीने विटनेरला निघाले असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पेट्रोल भरून रोडक्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीवरील दोघांनी श्रीकृष्ण वाणी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत श्रीकृष्ण वाणी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी सुरेखा वाणी या गंभीर जखमी झाल्या.

जळगाव तालुका पोलिसात गुन्हा

अपघातानंतर जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेऊन मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. या संदर्भात जळगाव तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags: crime newsjalgaon accident
Previous Post

गिरणा नदीपात्रात वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त, राजमुद्रा न्यूजचा दणका

Next Post

घरफोडीतील आरोपी जेरबंद : जळगाव एलसीबीची कामगिरी

Next Post

घरफोडीतील आरोपी जेरबंद : जळगाव एलसीबीची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!