• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँकेत निघाली बंपर भरती; जाणून घ्या अर्जासाठी आवश्यक तपशील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 5, 2022
in Uncategorized
0
बँकेत निघाली बंपर भरती; जाणून घ्या अर्जासाठी आवश्यक तपशील
Spread the love

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही नोकरी प्रोग्रामिंग असिस्टंटच्या पदांसाठी आली आहे. IBPS या बँक नोकरीच्या रिक्त जागांसाठी त्वरित भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ibps.in च्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वॉक-इन निवड प्रक्रियेद्वारे भरती केली जाईल.

IBPS प्रोग्रामिंग असिस्टंट रिक्रूटमेंट 2022 साठी आधी फॉर्म भरण्याची गरज नाही. पुढील अधिसूचनेसह फॉर्म देखील देण्यात आला आहे. ते डाउनलोड करा, भरा आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह 14 डिसेंबर 2022 रोजी IBPS, IBPS हाऊस, 90 फूट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, ऑफ डब्ल्यूई हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई- 400101 या या पत्त्यावर पाठवा.

किती मिळेल वेतन?

ज्यांना IBPS द्वारे बँकेत प्रोग्रामिंग असिस्टंटची नोकरी मिळते, त्यांना ग्रेड B नुसार वेतन मिळेल. ibps.in वर जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार तुमचे मूळ वेतन दरमहा २५ हजार रुपये असणार आहे. सुरुवातीच्या वेतनश्रेणीनुसार, तुम्हाला दरमहा सुमारे 47,043 रुपये मिळतील. याशिवाय, नियमानुसार पीएफ, वैद्यकीय सुविधा, एलटीसी, वृत्तपत्र बिल, कॅन्टीन सबसिडी, ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्तीसह इतर फायदे मिळतील. या सर्वांसह, तुमचे वार्षिक सीटीसी 9 लाख रुपये असणार आहे.

शैक्षणिक योग्यता

B.Tech, MCA, B.Sc IT, BCA, B.Sc Computer Science किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून समकक्ष पदवी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय किमान 23 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. याशिवाय, काही महत्त्वाच्या कौशल्यांचीही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती उमेदवार IBPS Programming Assistant Notification 2022 वरून मिळवू शकतात.

निवड प्रक्रिया

सर्वात आधी अर्जांची शॉर्ट लिस्टिंग होईल. त्यानंतर 90 मिनिटांची ऑनलाइन टेस्ट होईल. यानंतर मुलाखत घेतली जाईल. लेखी परीक्षेत अ‍ॅप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेजमधून 100 गुणांचे एकूण 100 प्रश्न विचारले जातील. दोन्ही विषयांचे 50-50 गुणांचे 50-50 प्रश्न असतील. परीक्षेची भाषा इंग्रजी असेल. निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

Tags: #bank jobgovenment jobrecruitment
Previous Post

पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? तेल उत्पादक देशांनी घेतला मोठा निर्णय

Next Post

जळगावात वाळू माफियांकडून गुजरातच्या पावत्यांचे सिंडीकेट

Next Post
जळगावात वाळू माफियांकडून गुजरातच्या पावत्यांचे सिंडीकेट

जळगावात वाळू माफियांकडून गुजरातच्या पावत्यांचे सिंडीकेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!