• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; दोघं हल्लेखोरांना अटक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 13, 2022
in क्राईम, जळगाव
0
आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, महात्मा फुले महामंडळ अपहार प्रकरणी अटक
Spread the love

जळगाव : रामेश्वर कॉलनीतील प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय-३६) तरूणाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून निमखेडी शिवारातील गिरणानदीच्या काठावरील महादेव मंदीराच्या मागे निर्घृण खून करून फरार झालेल्या दोघा संशयितांना उमाळा शिवारातून एमआयडीसी पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यराज नितीन गायकवाड (वय-२६) रा. गणेश नगर आणि सुनिल लियामतखाँ तडवी (वय-२६) रा. तांबापूरा, जळगाव असे दोन्ही संशयित आरोपींचे नावे आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी हा आईवडील, पत्नी आणि दोन मुलांसह रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला होता. गेल्या आठ वर्षांपासून विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने सफाई कर्मचारी म्हणून नोकरीला होता. अनैतिक संबंधाच्या संशयातून त्याचा सत्यराज गायकवाड आणि सुनिल तडवी यांनी संगनमताने प्रमोद सुरेश शेट्टी याचा शनिवारी १० डिसेंबर रोजी रात्री निमखेडी शिवारातील गिरणानदीच्या काठावरील महादेव मंदीराच्या मागे निर्घृण हत्या केली. यात तिक्ष्ण हत्यार आणि दगडाने त्याचा ठार केले. दुसरीकडे प्रमोद घरी आला नाही म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याची बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.

उमाळा शिवारातून अटक केली

सोमवारी १२ डिसेंबर रोजी प्रमोदचा मृतदेह निमखेडी शिवारातील गिरणानदीच्या काठावरील महादेव मंदीराच्या मागे आढळून आला होता. याप्रसंगी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. मयतांच्या नातेवाईकांकडून एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपींची माहिती घेतली. एमआयडीसी पोलीसांनी उमाळा शिवारातून खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सफौ अतुल वंजारी, पोना सुधीर सावळे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, हेमंत कळसकर, छगन तायडे, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील यांनी सापळा रचून दोन्ही संशयित आरोपींना उमाळा शिवारातून अटक केली आहे.

Tags: #murder threatjalgaon crime
Previous Post

BREAKING: जळगाव जिल्ह्यात आयकर विभागाची छापेमारी, बडे मासे हाती लागण्याची शक्यता

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी, ‘त्या’ व्यक्तीचा लागला शोध

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी, 'त्या' व्यक्तीचा लागला शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!