• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Job Recruitment: इंडियन ऑइलमध्ये सरकारी नोकरीची संधी, अशा प्रकारे करा ऑनलाइन अर्ज

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 18, 2022
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
Spread the love

मुंबई: सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. IOCL ने तांत्रिक आणि गैर-तांत्रिक दोन्ही क्षेत्रांसाठी तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवारांना या नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. IOCL च्या अधिकृत वेबसाइट iocl.com वर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. 3 जानेवारीपासून नोंदणी सुरू होणार आहे.

इंडियन ऑइलमध्ये एकूण 1760 पदे रिक्त आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, पश्चिम बंगाल यासह विविध ठिकाणी इंडियन ऑइलचे विभाग असून, यामध्ये नियुक्त्या केल्या जातील. उमेदवारांना यातील कुठल्याही प्रकल्पात काम करावे लागेल.

IOCL भरती पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:

टेक्निशियन अप्रेंटिससाठी उमेदवाराने आयटीआय केलेले असावे. मेकॅनिकल पदासाठी, उमेदवाराकडे अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदाच्या उमेदवाराकडे पूर्णवेळ पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

केवळ 18 ते 24 वयोगटातील उमेदवारांना अर्ज करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आरक्षित उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज कसा करायचा?

  • उमेदवारांना सर्वप्रथम IOCL iocl.com च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • वेबसाइटवरील करिअर विभागात जा आणि अर्ज करा.
  • येथे तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि सर्व माहिती द्यावी लागेल.
  • ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा.
  • सर्व माहिती तपासल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

निवड कशी होईल?

  • उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर केली जाईल.
  • ऑनलाइन परीक्षा MCQ स्वरूपात घेतली जाईल.
  • सर्व उमेदवारांना प्रथम ऑनलाइन चाचणी द्यावी लागेल, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि शेवटी वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

Tags: Indian Oil Jobrecruitment
Previous Post

जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी आ. मंगेश चव्हाण बिनविरोध

Next Post

पैशाच्या हव्यासापोटी डोंगरांना सुरुंग; ‘राजमुद्रा’च्या दणक्याने प्रशासनाला आली शरम

Next Post
परवानगी शेकडोची मात्र उत्खनन हजारो ब्रासचे; गौण खनिज वाहतूक ठेकेदारांचा गोरख धंदा

पैशाच्या हव्यासापोटी डोंगरांना सुरुंग; 'राजमुद्रा'च्या दणक्याने प्रशासनाला आली शरम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!