• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मागलवाडी गावाच्या पुनर्वसाना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 21, 2021
in जळगाव
0
मागलवाडी गावाच्या पुनर्वसाना संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Spread the love

 

रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | रावेर तालुक्यातील मागलवाडी गावातील ३५० घरंच्या पुनर्वसन व संपादनासाठी उपोषणाला बसण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सर्व शक्ती सेनेतर्फे आज जिल्हाधिकारी अभिजित राउत यांना निवेदन देण्यात आले. पुनर्वसनाच्या यादीत नाव असूनही शासनाकडून गावाला डावलले जात असल्याने गावाचे पुनर्वसनाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य सर्व शक्ती सेनेचे अध्यक्ष प्रा. संजय मोरे यांचेसह मांगलवाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. जळगाव येथील ज म प्र वि. कार्यकारी अभियंता अदिती कुलकर्णी यांनाही सदर निवेदन देण्यात आले असून मागणी एक महिन्यात पुर्ण न झाल्यास प्रा संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वा खाली संपुर्ण महाराष्ट्रात आदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

‘तापी नदीकाठावरील मांगलवाडी येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक क्र.५० मध्ये ठराव क्र.५०.७ मध्ये उर्ध्व तापी टप्पा-१ (हतनूर) प्रकल्पा आंतर्गत मांगलवाडी येथील ३५० घरांचे सम्पादन व पुनर्वसन मान्य असून सदरचा खर्च जलसंपदा विभागामार्फत करण्याकरिता सदरचे हमीपत्र असूनही याची दखल घेतली जात नाही. गेल्या काही वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून शासनस्तरावर संबंधित अधिकारी व मंत्री यांच्याजवळ पाठपुरावा करूनही या कामाची दखल घेतली गेलेली नाही. गाव तिन्ही बाजूने बाराही महिने पाण्याने वेढलेले असून नदीला पुराचे पाणी वाढल्यास, पावसाची झडी लागल्यास गावाची संपूर्ण जमीन ओलसर राहते. त्यामुळे घरांमध्ये सर्दावा (ओलावा) वाढून भिंतींना मीठासारखे पांढरे द्रव्य लागते. घरातील फाशीवर घर पाझरल्यासारखे पाण्याचे थेंब येतात. अनेकांना उंचावर झोपावे लागते. जमीन खोदल्यास जमीनीखाली जवळच ८ ते १० फुटावर पाणी लागेल. पूराचे पाणी जास्त दिवस राहील्यास अथवा यावेळी भुकंपाने जमीन हलल्यास गाव जमीनीखाली जाण्याचा मोठा धोका आहे. गावाच्या आजूबाजूला पाणी असल्याने सरपटणारे प्राण्यांपासून अनेकदा धोका निर्माण होतो.’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याप्रसंगी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य सर्व शक्ती सेनेचे अध्यक्ष प्रा.संजय मोरे, सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना, जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा सावळे, अनिल कोळी, कोळी राष्ट्रसंघ जिल्हाध्यक्ष, प्रा. सुभाष सपकाळे, विजय तायडे,  गजानन काडेले, धनराज कोळी, उमेश तायडे, दिपक तायडे आदी उपस्तित होते.

Tags: jalgaonjilhadhikari abhijit rautmagalvadiraversanjay moresarwa shakti sena
Previous Post

भाजप बोदवड तालुकातर्फे जागतिक योगा दिनानिम्मित योग शिबिर

Next Post

चक्क ३८ वर्षांनी मिळाली स्व-मालकीची शेतजमीन..!

Next Post

चक्क ३८ वर्षांनी मिळाली स्व-मालकीची शेतजमीन..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!