• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन : गुलाबराव देवकर यांना घेराव

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 28, 2022
in जळगाव
0
Spread the love

फैजपूर : मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. यानंतर ठरल्याप्रमाणे कारखान्याची विक्री देखील झाली. मात्र थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दुर करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची गाडी कारखान्याच्या गेटवर अडवून आपला रोष व्यक्त केला.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली असून खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. नवीन मालकांनी कर्मचार्‍यांची थकीत देणी देण्यास नकार केल्याने कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आज जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर हे आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली होती. या आधीच कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. देवकर यांची गाडी कारखाना गेटजवळ येताच कर्मचाऱ्यांनी गाडी अडवून आपल्या मागण्या लावून धरल्या.

खासदार रक्षा खडसे यांनी दिली भेट

मसाकाच्या कर्मचार्‍यांनी आज सकाळपासून अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्ग रोखून धरत आपला रोष व्यक्त केला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. तर रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनात खासदार रक्षा खडसे, अमोल हरीभाऊ जावळे, शरद महाजन आदींसह परिसरातील लोकप्रतिनिधींनी देखील भाग घेतला आहे.

Tags: #gulabrao deokarfaijpurjdcc bank jalgaonmadhukar sugar factorymssk
Previous Post

आता नाकावाटे मिळणार लस! जाणून घ्या कोणाला घेता येणार ही लस, कुठे करावी नोंदणी

Next Post

लोकायुक्त विधेयकास राज्य शासनाची मंजुरी ! विरोधकांनी केला सभात्याग

Next Post

लोकायुक्त विधेयकास राज्य शासनाची मंजुरी ! विरोधकांनी केला सभात्याग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!