• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषदेतील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता! मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली निर्देश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 29, 2022
in जळगाव
0
जिल्हा परिेषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार-पालकमंत्री गुलाबराव पाटील
Spread the love

जळगाव : राज्यातील 34 जिल्हा परिषदांसाठी सध्या 173 उपविभाग मंजूर आहेत. तथापि पाणीपुरवठा विभागाचे वाढलेले कामकाज विचारात घेऊन प्रत्येक तालुक्यासाठी एक स्वतंत्र उपविभाग मंजूर करण्यास पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने मान्यता दिलेली आहे.

त्या अनुषंगाने राज्यात एकूण 355 तालुक्यांसाठी 355 उपविभाग व या उपविभागांत प्रत्येकी 9 या प्रमाणे एकूण 3195 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत तर वाहन चालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, माहिती शिक्षण व सुसंवाद तज्ञ अशा एकूण 1760 पद बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

जागा वाढविण्याचा निर्णय

राज्यभरात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. राज्यात २०२४ पर्यंत पाणी पुरवठा योजनांचे काम शंभर टक्के पूर्ण करायचे आहे. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषदांमधील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने या विभागातील जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून, राज्यात सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांनाही यामुळे वेग येणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात 15 उपविभाग तयार होणार

जळगाव जिल्ह्यात एकूण स्वतंत्र 15 उपविभाग तयार होणार असून पूर्वी या विभागात 60 पदं होती तर आता 135 ने वाढ होऊन ती 195 इतकी होणार आहे. त्यामुळे जल जीवन मिशन यशस्वी होण्याकरता व त्याचे बळकटीकरण होण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने व निर्देशानुसार कालच म्हणजे 28 डिसेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

असा असेल जिल्ह्याचा उपविभाग

जळगाव जिल्ह्यात पूर्वी स्थापत्य उप अभियंता 6, कनिष्ठ अभियंता 36, वरिष्ठ सहाय्यक 6, कनिष्ठ सहाय्यक 12 एकूण अशा 60 पदांना मंजुरी होती. मात्र सदर शासन निर्णयामुळे या पदांमध्ये 75 ने वाढ होऊन एकूण 135 नियमित पदांना मान्यता मिळालेली आहे. तर नव्याने बाह्य यंत्रणेद्वारे वाहनचालक 15, डाटा एन्ट्री ऑपरेटर 15 व चतुर्थ श्रेणी 30 असे एकूण 60 कर्मचारी या पदांना मंजुरी मिळाल्यामुळे जिल्ह्यात एकूण पूर्वी असलेल्या 60 पदांमध्ये नव्याने 135 ने वाढ होऊन आता 195 पदे मान्यता मिळालेली आहे पूर्ण त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन मिशन बळकट होण्यास मदत होणार असून प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र एक उपविभाग झाल्यामुळे पाणीपुरवठा यशस्वी करण्यासाठी मोठा दिलासा मिळालेला आहे.

Tags: gulabrao patiljalgaon news
Previous Post

बंद घरावर चोरट्यांचा निशाना; सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड लंपास

Next Post

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Next Post
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!