• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टीम इंडियाचा क्रिकेटर ऋषभ पंतचा भीषण अपघात, डुलकी लागल्याने घडली दुर्घटना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 30, 2022
in क्राईम
0
Spread the love

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत जखमी झाला आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत. ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

गाडी चालवताना झोप लागल्याने अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. गाडी चालवताना झोप आल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ऋषभ पंत गाडीत एकटाच होता. अपघात झाल्यानंतर गाडीला आग लागली. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. ऋषभ पंतला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऋषभची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. ऋषभ दिल्लीहून उत्तराखंडमध्ये आपल्या रुडकी येथील घरी येत होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली.

ऋषभच्या मदतीसाठी मुख्यमंत्री धावले

ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला आहे. उत्तराखंडमधील रुरकीजवळ ही घटना घडली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, गरज पडल्यास ऋषभला एअरलिफ्ट केले जाईल. सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. ऋषभ पंतच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असंही धामी यांनी सांगितलं आहे.

Tags: accidentIndian cricketerRishabh Pantuttarakhand
Previous Post

हिरा बा यांनी मजुरी करुन परिवाराला लावला हातभार; पंतप्रधान मोदींनी सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी

Next Post

खळबळजनक! वृध्द महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने लंपास

Next Post

खळबळजनक! वृध्द महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!