• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव एसीबीची कारवाई! जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपीकासह तिघे जाळ्यात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 31, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव : जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तब्बल १९ वर्षांपासून वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीला जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देवून तक्रारदार यांच्याकडून १० लाख रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपीक, समिती सदस्यसह मध्यस्थी अशा तीन जणांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.

तक्रारदार हे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील रहिवाशी आहे. अनुसूचीत जमाती (एस.टी.) प्रवर्गासाठी त्यांनी स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी प्रकरण सादर केलेले होते. मागील १९ वर्षापासुन वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून देखील तक्रारदार यांना त्यांचे स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीला सदर दोन्ही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देण्याबाबत निकाल दिला होता.

आरोपींमध्ये यांचा आहे समावेश

सदर न्यायालयाची प्रत जात पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे जमा केल्यानंरही सदर प्रकरणांचा निकाल न दिल्याने तक्रारदार हे कार्यालयातील अनिल पाटील (वय ५२, कनिष्ठ लिपीक, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-३ रा.शिरपुर), निलेश अहीरे (वय ५२, समिती सदस्य, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-१ रा.नंदुरबार/नाशिक व राजेश ठाकुर (वय- ५२, कनिष्ठ लिपीक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कार्यालय,नाशिक वर्ग-३) या तिघांनी तक्रारदार यांच्याकडे १० लाखांची मागणी केली.

तिघांनी पैसे मागितल्याचे निष्पन्न

यासंदर्भात तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार जळगाव पथकाने कॉल डिटेल आणि तांत्रिक यंत्रनेच्या माध्यमाच्या चौकशीतून तिघांनी पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिघांवर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे अभिषेक पाटील करीत आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, जाधव, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार रवी घुगे, अशोक अहिरे, पोना बाळु मराठे, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, पोकॉ. प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.

Tags: abc trapdhule crime
Previous Post

अमळनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; बाळासाहेबांच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

Next Post

जळगावातील पाच डॉक्टरांची सीबीआयतर्फे चौकशी; एफएमजीई परीक्षा न देता सुरु केली वैद्यकिय सेवा

Next Post

जळगावातील पाच डॉक्टरांची सीबीआयतर्फे चौकशी; एफएमजीई परीक्षा न देता सुरु केली वैद्यकिय सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!