• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 9, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्यासोबत जायला खूप अडचणी आल्या. ते अक्षरश: ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटी आले. तसेच गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना माहित आहे ते कसे आले, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी अचानक जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. रात्री जळगावातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचा महाअधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.

आमच्या डोक्यात हवा जाणार नाही

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही धाडसाने निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचे निर्णय कोणी घेत नव्हतं. आम्ही केले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास बाळगा, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

गिरीश महाजन खेळाडू माणूस…

बडगुजर समाज छोटा असला तरी तुमची एकजूट महत्वाची आहे. आपण सर्व बडगुजर एकत्र केले तर गुजर समाजाची किती मोठी ताकद होईल, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. आमदार किशोर पाटलांनी आग्रह केला अधिवेशनाला आलंच पाहिजे. आमदार गिरीश महाजन आपला खेळाडू माणूस आहे. सर्व खेळ खेळणारा माणूस आहे. परदेशात खेळाडूंना विमानाने पाठवणारा हा पहिला मंत्री, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली.

सीएम म्हणजे कॉमन मॅन

सीएम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर. पण मी म्हणतो कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस! आपल्या राज्याला केंद्राचा देखील मोठा पाठिंबा आहे. केंद्र सरकारने आपल्याला दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्राचा देखील आमच्या सरकारला पाठिंबा आहे. म्हणून त्यांच्याशी संबंध झोपासावे लागता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

30 हजार पाणीपुरवठा योजना मंजूर

मला शेतकऱ्यांविषयी फार प्रेम आणि जिव्हाळा आहे. त्याचा देखील जीवनमान बदलला पाहिजे. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी हे सरकार आहे. अल्पावधीत हे सरकार लोकप्रिय होत आहे. 30 हजार पाणीपुरवठा योजना मंजूर करणे हा देखील रेकॉर्ड आहे. शहरी भागासह ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, असंही शिंदे म्हणाले

Tags: #cm eknath shinde#shivsena aamdar
Previous Post

20 हजाराच्या लाचेचा स्विकार – भुमी अभिलेख लिपीक अडकला सापळ्यात

Next Post

जळगावातील दुकान फोडणाऱ्या आरोपीस अटक; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई

Next Post
जळगावातील दुकान फोडणाऱ्या आरोपीस अटक; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई

जळगावातील दुकान फोडणाऱ्या आरोपीस अटक; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!